(पर्यावरण दिनानिमित्त निरंकारी मिशनतर्फे पर्वतीय पर्यटन स्थळांवर वृक्षारोपण व स्वच्छता अभियान – महाराष्ट्रातील 6 स्थळांचा समावेश.)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

मानवाने नेहमीच स्वत:च्या विकासासाठी प्राकृतिक संसाधनांचे शोषण केले असून त्याचा परिणाम म्हणून आज आपण पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचे पाहत आहोत.या हानीपासून पृथ्वीचा बचाव करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या प्रति– जागृती निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून दरवर्षी ‘विश्व पर्यावरण दिवस’ आयोजित केला जातो. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा,संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संयुक्त राष्ट्रांची थीम ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’या विषयाला अनुसरुन बुधवारी ५ जून रोजी संपूर्ण भारत वर्षातील पर्वतीय पर्यटन स्थळांवर विशाल वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संकट उभे ठाकले असताना एका बाजुला प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्यासाठी संपूर्ण मानवजात एका मंचावर एकत्र येत असताना निरंकारी मिशन आपल्या या अभियांच्या माध्यमातून युवापिढीला सकारात्मक ऊर्जा प्रदान करत आहे जे नि:संदेह उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे.संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक,सेवादल सदस्य, भक्तगण आणि संबंधित शहरांतील रहिवाशी एकत्रीतपणे या महाअभियानाचा भाग बनणार आहेत ज्यायोगे प्रकृतीच्या संरक्षणार्थ एक अर्थपूर्ण लक्ष्य गाठले जाऊ शकेल.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले,की निरंकारी मिशन वर्ष २०१४ पासूनच संयुक्त राष्ट्रांच्या युनायटेड नेशन एन्व्हायरनमेंट प्रोग्राम‘ या पर्यावरण कार्यक्रमाच्या थीमनुसार ‘विश्व पर्यावरण दिवस’ आयोजित करत आले आहे.प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निरंकारी मिशन मार्फत संपूर्ण भारत वर्षातील १८ पर्वतीय पर्यटक स्थळांवर,ज्यामध्ये प्रामुख्याने उत्तराखंडमधील मसूरी,ऋषिकेश,लैंसडाउन नैनीताल,चकराता,भवाली;हिमाचल प्रदेशमधील शिमला,मनाली,धर्मशाला;गुजरातमधील सापुतारा; महाराष्ट्रातील महाबळेश्वर,पांचगनी,खंडाळा, लोनावळा,पन्हाळा,सोमेश्वर;सिक्किम येथील गीजिंग शहर आणि कर्नाटकच्या नंदी हिल्स अशा पर्वतीय स्थळांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात येईल ज्यामध्ये सर्व स्वयंसेवक एकत्र येऊन सर्वप्रथम निराकार प्रभूची प्रार्थना करतील ज्यायोगे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न व्हावा. त्यानंतर मिशनचे युवा स्वयंसेवक‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या थीमवर नुक्कड़ नाटिकांचे सुंदर सादरीकरण करतील आणि पर्यावरण संकटाच्या प्रति जनजागृती करतील. तसेच सर्व स्वयंसेवक हातामध्ये पर्यावरण रक्षणविषयक घोषणाफलक व बॅनर्स उंचावून मानवी साखळी निर्माण करतील. संत निरंकारी मिशन सातत्याने आध्यात्मिक जागृतीबरोबरच मानवतेच्या सेवेत सातत्याने समर्पित आहे. या सेवांमध्ये मुख्यत्वे ‘अमृत प्रोजेक्ट’-जल साठ्यांचे संरक्षण, ‘वननेस वन’-वृक्षारोपण, तलासरी – सिमेंट नाला बांध (सीएनबी) परियोजना, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरांचे आयोजन इत्यादिंचा समावेश आहे. या व्यतिरिक्त समाजोत्थानासाठी महिला सशक्तीकरण, युवाशक्तीला सकारात्मक मार्गदर्शन यासाठी विविध कल्याणकारी परियोजना राबवित आहे. मानव कल्याणासाठी या समस्त योजना सद्गुरुंच्या दिशा निर्देशानुसार विश्वभर सातत्याने राबविल्या जात आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button