जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व दैनिक समर्थ गावकरीचे जुन्नर तालुका प्रतिनिधी तथा जेष्ठ पत्रकार रविंद्र भोर आणि प्रियदर्शनी महिला पतसंस्था विद्यमान संचालक कविता भोर यांची ही कन्या मार्च २०२४ च्या एसएस सी परीक्षा सरस्वती विद्यालय उदापुर येथून ९५:२० % मार्क्स मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून वडिलांनी तिच्याबद्दल पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. वडील बीएबीएड(इंग्लिश) उच्चशिक्षित पत्रकार व आई एमए (मराठी) स्वतःचा कुटिरोद्योग व्यवसाय त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असताना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत घरकामात आईला मदत करत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत प्रथम क्रमांक मिळवीत उत्तीर्ण झाली असून अनेक अडथळे पार करून हे यश ऋतुजाने प्राप्त केले आहे. इयत्ता दहावीत काही नकारात्मक विचारांच्या व्यक्तींनी अगदी पैजा लावून ही मुलगी इयत्ता दहावीला प्रथम येऊ शकत नाही त्यासाठी त्यांनी इतर मार्गाचा अवलंब करून ऋतुजाला ओहर कॉन्फिडन्स आहे असे गोंडस प्रचार केला मात्र आई- वडिलांनी आपल्या मुलीशी योग्य संवाद साधत मुलीला ट्रॅकवरून न ढळू देता वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

ऋतुजाच्या या यशाचे जुन्नर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यामध्ये जुन्नर तालुका आमदार अतुल बेनके,खासदार डॉ.अमोल कोल्हे,माजीआमदार शरददादा सोनवणे,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,भारतीय जनता पार्टीचे आशाताई बुचके,भगवान घोलप,माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले,मोहित ढमाले,उध्दव बाळासो ठाकरे गटाचे माजी आमदार बाळासाहेब दांगट माऊली खंडागळे,शरद चौधरी तसेच जुन्नर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सदस्य याशिवाय विद्या विकास मंडळ,उदापुरचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे,स्वर्गीय बबननदादा कुलवडे ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास शिंदे,श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे,ग्रामविकास मंडळ अध्यक्ष बाजीराव कुलवडे,तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल कुलवडे,अडाणी कबाडी मंडळाचे अध्यक्ष मोहन वलव्हणकर, प्रियदर्शनी महिला पतसंस्था अध्यक्ष डॉ.पुष्पलता शिंदे, भैरवनाथ महिला ग्राम संघ अध्यक्ष मनिषा भोर,यांनी आपल्या संचालक मंडळाच्या वतीने व माजी पहिल्या महिला सरपंच प्रमिलाताई शिंदे,बीएम शिंदे सर यांनी कौतुक केले.

याशिवाय जुन्नर तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्था यामध्ये प्राथमिक शाळा, उदापुर “लिफ्ट फॉर अपलिफ्ट”” पुणे,श्री छत्रपती कॉलेज,जुन्नर, शंकरराव बुट्टे पाटील,जुन्नर,समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिटट्युशन्स बेल्हे बांगरवाडी,जयहिंद कॉलेज,कुरण,तृप्ती प्रॉडक्शन शिरूर,विद्याधाम प्रशाला शिरूर,विद्या कोचिंग क्लासेस जुन्नर या शिवाय फेसबुक,व्हाट्सएपच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी ऋतुजाजा सन्मान करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button