पुणे : प्रतिनिधी
दिनांक 30 मे 2024अतोनात कष्ट, योग्य व्यवस्थापन, निसर्गाची साथ, योग्य वेळी उपलब्ध झालेले भांडवल, प्रारब्ध आणि बाजारभावाने दिलेली साथ या सगळ्या गोष्टींचा संगम शेतकऱ्याला मिळाला की त्याच्या मेहनतीची किंमत त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही.
याची प्रचिती मु. पो. बल्लाळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील शेतकरी श्री आशिष पांडुरंग काफरे यांना आली.24 एप्रिल 2024 रोजी असलेल्या तीन एकर जमिनीमध्ये धन्याचे उत्पन्न घेण्याचे ठरले व 300 किलो धना पेर केली.वीज टाईम टेबल त्रासदायक असल्याकारणाने रात्र पाळी करून पाण्याचे नियोजन केले. वेळीच केलेली तणनाशक फवारणी नंतर खुरपणी योग्य कीड नियंत्रण याच्या जोरावर उत्कृष्ट अशा आंध्रा जातीच्या धन्याची उत्तम शेती केली. सध्या कोथिंबिरीला असलेले चांगले बाजार भाव असल्याचा फायदा शेतकऱ्याला झाला आणि तीन एकरची कोथिंबीर 12 लाखाला विक्रमी भावात विकली गेली आणि आशिष काफरे यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले.