एक हात मदतीचा या माध्यमातून आमदार थोरवे सर्वसामान्यांच्या मदतीला गेले धावून.
प्रतिनिधी : सचिन थोरवे
महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी वादळी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये जे वादळ झाले त्यामध्ये अनेक गोरगरीब जनतेचे घरांवरील पत्रे कवले आणि अनेक शेड जमीनदस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जोरदार वादळामुळे अनेक गोरगरीब जनतेचे कायमस्वरूपी भरून न येण्यासारखे नुकसान झाले असून अनेक नागरिकांचे प्रपंच देखील यामुळे उघड्यावर आल्याचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आपल्या ठराविक कार्यकर्त्यांसह नुस्कान ग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर यांना आपण काहीतरी मदत केली सरकारची मदत ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल परंतु आत्ता अति तातडीची मदत मिळाली पाहिजे ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि लगेच कुठलाही विलंब न करता त्यांनी नूस्कान ग्रस्त भागातील नागरिकांना स्वखर्चातून त्या ठिकाणी सिमेंट पत्रे वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यांच्यापर्यंत ते पत्रे पाठवून उघड्यावर पडलेला संसार उभाकरण्याचे काम खऱ्या अर्थाने आमदार थोरवे यांनी केले त्यामुळे सर्व सामान्य माणसाच्या हृदयामध्ये आमदारांबद्दल अतिशय चांगल्या भावना निर्माण झाल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील 36 आदिवासी पाड्यांमधील मधील 106 नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून त्यांना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन च्या वतीने 850 पत्रांचे वाटप करण्यात आले आहे
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या वादळाचा तडाखा सर्वसामान्य जनतेला बसला परंतु प्रत्येकाने सरकारी मदतीची अपेक्षा ठेवली परंतु महाराष्ट्रात एकमेव महेंद्र शेठ थोरवे असे आमदार आहे की त्यांनी स्वतःच्या खिशातून आपल्या मतदारसंघातील जनतेची दखल घेऊन त्यांना एक प्रकारचा न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे .त्यामुळे जनतेतूनही त्यांच्या कामाचे कौतुक होत असून आमदार थोरवे हे आमच्यासाठी देवाप्रमाणेच धावून आल्यामुळे वादळामुळे वाऱ्यावर आणि उद्ध्वस्त झालेल्या प्रपंचाला सावरण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा हातभार लागल्यामुळे आम्ही सुस्थितीत असल्याचेही समाधान येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर पहायला मिळत असून आम्ही भविष्यात आमदार थोरवे यांच्यासोबत राहणार असल्याचेही येथील लोक सांगत आहे.