प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, केंदूर येथील कलाशिक्षक संजय जोहरे यांना शिक्षक फाऊंडेशन द्वारा संचलित, महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांचेकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. गुरूदक्षिणा हॉल , कॉलेज रोड,नाशिक येथे भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात केंदूरचे कलाशिक्षक संजय जोहरे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार २०२४’ हा सुप्रसिद्ध मराठी चित्रपटातील अभिनेत्री किशोरी शहाणे, सुप्रसिद्ध कवी अनंतजी राऊत(मित्र वणव्यात गारव्यासारखा फेम कवी), महाराष्ट्र शिक्षक पॅनल चे अध्यक्ष दिपक चामे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कलाशिक्षक संजय जोहरे यांचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा उत्कृष्ट निकाल, केंदूरचे सुपूत्र शहीद मेजर प्रदीप ताथवडे व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विदयार्थ्यांध्ये जागृती होण्यासाठी घेण्यात येणा-या चित्रकला स्पर्धा, तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविलेले विविध उपक्रम, नृत्य-नाट्य स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये केलेली सामाजिक जागृती या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याचे विदयालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी सांगीतले.
संजय जोहरे यांच्या या कार्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळु़खे, सचिव शुभांगीताई गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सहसचिव प्रशासन डॉ.राजेंद्र शेजवळ, सहसचिव अर्थ सिताराम गवळी, विदयासमिती अध्यक्ष श्रीराम साळुंखे, विदयासमिती सचिव अरुण सुळगेकर, व विदयालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांचेकडून प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. समर्पण, विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ, काळानुरूप होणारे बदल स्विकारण्याची क्षमता केवळ शिक्षकात आहे, प्रत्येक शिक्षकाने आपापले ब्रँड व्हायला हवे असे आवाहन किशोरी शहाणे यांनी आपल्या भाषणात केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे, सुप्रसिद्ध कवी अनंतजी राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक चामे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष मेघाराणी जोशी, सचिव सतिश कोळी, सहसचिव राजश्री पाटील, तसेच राज्यसमन्वयक पंकजकुमार पालीवाल, चंद्रकांत गोरगिले, मनिषा पवाळ, संध्या वाळुंज, भगवान जायभाये, गिरीश दारूंटे, रंगनाथ सगर, पांडुरंग यलमट्टे, श्रीकांत शेंडगे, तसेच सर्व जिल्हा समन्वयक उपस्थित होते.