प्रतिनिधी : शिरूर

शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील वार्ताहार प्रकाश वसंत पवार यांची माजी सरपंच तसेच नवनिर्वाचित सदस्य यांचा मुलगा यांनी नाहक बदनामी करत सगळ्या पंचक्रोशीत चर्चे ला उधान आणले होते. वार्ताहाराने बातम्या छापू नये म्हणून काही राजकीय मंडळीच्या सांगण्याने सत्याची बाजू मांडणाऱ्या वार्ताहाराची बदनामी केली. संबंधित चर्चेचा प्रकार त्याच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत संबंधीताशी संपर्क केला आसता त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ केली. मानसिक मानहानी झाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दि.२१/५/२०२४ रोजी तक्रार अर्ज देत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची भेट घेवून सर्व प्रकार सांगितला.

द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी संबंधित विषयाबाबत चर्चा करून योग्य न्याय देण्याची मागणी केली. पुणे जिल्ह्या सह तालुक्यातील पत्रकार सदस्य अध्यक्षांनी देखील पाठबळ देत पत्रकार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.दि.२२/५/२०२४ रोजी संबंधिता वर गुन्हा नोंद करण्यात आला.पत्रकारांनवर हल्ले, अन्याय होत असल्यास त्यांनी द युवा ग्रामीण पत्रकार संघ केव्हा ही पत्रकारांच्या पाठीशी उभी असुन कायदेशीर मार्गदर्शन करणार तसेच विविध पत्रकार संघांनाही ते नेहमीच पाठींबा देणार आसल्याबाबत संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी संगितले.राज्य उपाध्यक्ष हेमंत साठे तसेच सह सचिव विवेकानंद फंड यांनी राज्यात पत्रकारांचे संघटन करून त्यांच्या विविध समस्या सोडवण्यास आम्ही कटीबद्ध राहणार आसल्याचे सांगितले.वार्ताहाराला न्याय मिळावा म्हणून द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या पदधिकाऱ्यानी पाठींबा देत मोलाचे योगदान दिले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button