जुन्नर तालुका प्रतिनिधी:- रविंद्र भोर
उदापुर ता:-जुन्नर येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून गेली दोन महिन्यात जीबीएस या विचित्र आजाराने तीन रुग्ण तर डेंग्यू व टायफॉईड चे अनेक रुग्ण सध्या खाजगी दवाखाण्यात उपचार घेत असून ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे.
गेली तीन महिन्यापूर्वी म्हणजे १५ मार्चला सरस्वती विद्यालय उदापुर या शाळेतील इयत्ता आठवीत शिकत असणारा कुणाल बर्डे याला जीबीएस या विचित्र आजाराने ग्रासले असून आजही पुणे येथील डी,वाय. पाटील या रुग्णालयात उपचार घेत असून कोणत्याही प्रकारची फारसी सुधारणा त्यात दिसून येत नाही त्यानंतर एक दीड महिन्याच्या अंतराने सार्थक भारती या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला व साक्षी भुजबळ या मुलीला या आजाराने कवेत घेतले मात्र सार्थक भारती हा विद्यार्थी तातडीने पुणे येथील जोशी हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार मिळाल्याने या जीबीएस या आजारातून सावरला आहे.त्यानंतर उदापुरला डेंग्यू व टायफॉईड या आजारांनी अनेक लहान मोठ्या स्त्री पुरुषांना ग्रासले असून यातील जवळपास सर्वच रुग्णांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेत असून काही रुग्ण बरे झाले आहेत मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर यांना याबाबत माहिती मिळाली नसावी असे वाटते.
या बाबत ग्रामपंचायत ने डेंग्यू व इतर आजारांवर मत करण्यासाठी गावात व वस्त्यांमध्ये डास, मच्छर प्रतिबंधक रसायन फवारणी अथवा धुराची फवारणी करून आरोग्य कर्मचारी यांना घरोघरी जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात करावी अशा सूचना देण्यात याव्यात असे ग्रामस्थांनी सुचविले आहे.यावेळी माहे एप्रिल पासून उदापुरमध्ये डेंग्यू या रोगाने अनेक रुग्ण ग्रासले आहेत त्यापैकी माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन वलव्हणकर,विद्यमान ग्रामपंचायत सदस्या व माजी उपसरपंच डॉ. पुष्पलता शिंदे,वैष्णवी शिंदे,विघ्नेश शिंदे,शितल वलव्हणकर, छाया बुगदे,नंदा खंडागळे, साक्षी खंडागळे,मंगेश भास्कर,कविता कुलवडे,तर रतन बेळे,चैतन्य भास्कर,ओंकार वलव्हणकर हे तीन टायफॉईड आजाराचे रुग्ण आहेत,यामध्ये प्रमिला वलव्हणकर यांना डेंग्यू झाल्याने पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा त्यात दुर्दैवाने मृत्यू झाला असून गावात व वाड्यावस्त्यांवर अनेक रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत ने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने तपासणी सुरु करुन योग्य ती प्रतिबंदात्मक उपाय योजना राबविण्यात यावी अशी मागणी उदापुरच्या ग्रामस्थांनी केली आहे.