जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
नारायणगाव ता:-जुन्नर येथे महादेव अॅप प्रकरणी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाने केली असून ९०.हुन अधिक जगांना ताब्यात घेतले आहे,अशी माहिती पुण्याचे एसपी पंकज देशमुख यांनी दिली, पुणे नाशिक महामार्गावरील गॅलेक्सी व्हिजन अंतर्गत असलेल्या एका तीन मजली इमारतीत महादेव अॅप अंतर्गत ऑनलाइन सट्टा चालत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवार दि:-१४ मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला असता बेटिंगच्या महादेव बुक आणि लोटस ३६५ या दोन वेबसाईट अंतर्गत पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले,पोलिसांनी पंचनामा करून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेले मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले असून पुढील कारवाईसाठी तेथील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
नारायणगाव येथे गेल्या ऑनलाइन से दोन महिन्यापासून सट्टा चालू असून त्यामध्ये ९० हून अधिक कर्मचारी सहभागी होते.त्यामध्ये नारायणगाव जुन्नरसह परराज्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपूर्ण आर्थिक व्यवहार ऑनलाइन होत होते व पेमेंट वेगवेगळ्या अकाउंट वरून फिरवून देण्यात येत होते असे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. हे संपूर्ण कामकाज नारायणगाव येथून चालू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणगाव येथील मुख्य सूत्रधार ऋत्विक कोठारी व जुन्नरचा राज बोकरिया असल्याचे पुढे येत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. महादेव अॅपवर वेगवेगळ्या खेळांचे सट्टे व व्हर्चुअल गेम्सची आर्थिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात चालू होती.यावेळी परिसरातील रहिवाशांना आश्चर्याचा धक्काबसला कारण व्हीजन गॅलेक्सी सोसायटीमध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने अचानक केलेल्या कारवाईमुळे परिसरातील सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. गेली दोन महिन्यापासून तीन मजली भव्य इमारतीत महादेव बेटिंग अॅप अंतर्गत ऑनलाइन सट्टा चालू आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती.
त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून अचानक पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा आल्याने रहिवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संशय येण्याचे कारणच नाहीऑनलाइन सट्टा बाजारासाठी वापरण्यात आलेली तीन मजली इमारत आयटी लॅबसाठी पाहिजे असे सांगून भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती.त्यामुळे महादेव बॅटिंग अॅपद्वारे चालू असलेल्या ऑनलाईन सट्ट्याचा संशय कोणालाही आला नाही, इमारतीमध्ये जेवण तयार करून देण्यासाठी पाच ते सात आचारी काम करीत होते.तर ऑनलाईन काम करणारे ९० हून अधिक कर्मचारी दिवसभर इमारतीच्या बाहेर पडत नव्हते. त्यामुळे इमारतीच्या भोवती वर्दळ नसल्याने कोणालाही संशय येण्याचे कारण नव्हते. परंतु रात्रीच्या वेळी आलिशान गाड्या तिथे येत असल्याने संशयाचे वादळ घोंगावू लागले होते. पोलीस शोध घेणार:
:-नारायणगाव येथील भरवस्तीत-;तीन मजली इमारतीत चालू असलेल्या ऑनलाईन सट्टा प्रकरणी कुठपर्यंत धागेदोरे पोहोचले आहे, याचा शोध पोलीस घेणार आहे.कदाचित चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता असून संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधिकाऱ्यांसह पन्नासहून अधिक पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता