जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
दिनांक. ०५/०५/२०२४ रोजी ओतूर वनपरिक्षेत्र अंतर्गत मौजे लेंडेस्थळ,पिंपळवंडी ता:-जुन्नर जि.पुणे येथे श्रीमती.प्रियंका मनोज हुलवळे यांचेवर सायं.०५ वाजता शेतात काम करताना बिबटयाने हल्ला केला. यानंतर त्यांना उपचारासाठी विघ्नहर हॉस्पिटल नारायणगाव येथे दाखल करण्यात आले.यानंतर दि:-८ मे रोजी कु.रुद्र महेश फापाळे रा काळवाडी ता:-जुन्नर जि:-पुणे या ८ वर्ष मुलावर सकाळी बिबट्याने हल्ला केला असता त्यात त्याचा मृत्यु झाला नंतर दि:- १०/ ०५/२२४ रोजी श्रीमती.नानुबाई सिताराम कडाळे रा:- गाजरपट पिपंरी पेंढार हया शेतात बाजरीचे राखण्याचेकाम करत असताना बिबट्याने त्यांचेवर हल्ला केला यामध्ये त्यांचा मूत्यु झाला.
यानंतर सदर घटना दरम्यान वनविभागाने सदर हल्ल्याच्या क्षेत्रामध्ये बिबट जेरबंद करण्यासाठी ४० पिंजरे, २० ट्रॅप कॅमेरे, ड्रोन सर्व्हे व लोकांनमध्ये जनजागृती दिवसरात्र गस्त सुरू केली.यामध्ये दिनांक. ०८/०५/२०२४ रोजी मौजे लेंडेस्थळ पिंपळवंडी येथे बिबट जेरबंद करण्यात यश आले.नंतर दिनांक.१०/ ०५/२०२४ रोजी पिंपरी पेंढार येथे ३ बिबट पकडण्यात यश आले.सदर भागामध्ये आत्ता पर्यंत जेरबंद करण्याचे कार्यवाही चालु असुन आतापर्यंत ७ बिबट जेरबंद करण्यात आले यामध्ये हल्ला करणार बिबट जेरबंद करण्यात आले आहे. यानंतर हि वनविभागाची बिबट जेरबंद करण्याची कार्यवाही चालु राहणार आहे.सदर कारवाहीच्या दरम्यान येडगाव येथील सहयाद्री पुलावर वनविभागाने ३ बिबट सोडण्यात आले अशी आफवा पसरवण्यात आली.व एका स्थानीक युट्युब चॅनेल ने त्याला प्रसिध्दी दिली यामुळे मौजे काळवाडी व पिंपरी पेंढार येथे बिबट हल्ल्यावेळी लोकांच्या मनात सदर हल्ले हे सोडलेल्या बिबटयाने केलेले आहेत असा समज निर्माण झाला.यामुळे वनविभागावर रोष निर्माण होऊन व गैरसमज निर्माण होऊन आक्रोश दिसुन आला.यामुळे वनकर्मचारी यांना शासकीय कामांत अडथळा व मारहान झाली असुन यामध्ये एक महिला वनरक्षक जखमी झाली आहे.
वनविभागाने सदर नैसर्गिक आपत्ती मध्ये दिवसरात्र काम करुन बिबट जेरबंद करण्याचे काम केलेले असुन सध्या परिस्थीती नियंत्रनात आणन्यात यश मिळाले आहे.तरी या निमित्ताने वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते कि,नागरीकांनी चुकिच्या बातम्या व अफवा यावर विश्वास ठेवु नये. तसेच प्रसार माध्यमानी बातमी प्रसारीत करताना वनविभागाशी खातरजमा करुनच बातमी दयावी. वनविभाग बिबट समस्या सोडविण्यास प्रयत्नशिल असुन नागरीकांनी चुकीच्या बातम्या व अफवा पसरवु नये नागरिकांनी व माध्यमानी सहकार्य ठेवावे.