जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
द हंस फाऊंडेशन व शिक्षणा फाऊंडेशन पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बल्लाळवाडी येथे पाखरांची शाळा हे उन्हाळी शिबिर दि १९ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत घेण्यात आले होते.यात सर्व विद्यार्थ्यां साठी शाळेविषयी आवड,कलागुणांमध्ये वाढ,पायाभूत कौशल्यांचा विकास,वैयक्तिक स्वच्छता,परिसर स्वच्छता इ.उपक्रमांवर भर देऊन वैशिष्यपुर्ण उपक्रम घेण्यात आले.
त्याच बरोबर विद्यार्थ्यांचे वाचन,लेखन ,आत्मविश्वासात वाढ,सहकार्याची भावना नेतृत्व कौशल्य विकास यावर प्रामुख्याने भर देण्यात आला दहा दिवस चाललेल्या या उपक्रमात शिक्षणा फाऊंडेशनचे समन्वयक कृष्णा दुधवडे व विशाल हगवणे यांनी उत्तम मार्गदर्शन केले.या उपक्रमातील निरीक्षणातून तीन क्रमांक काढण्यात आले प्रथम क्रमांक धनंजय जितेंद्र नायकोडी.द्वितीय क्रमांक दुर्वा रवींद्र काकडे,तृतीय क्रमांक,स्वराली मंगेश नायकोडी या विद्यार्थ्यांनी पुरस्कार संपादन केले पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले .
याप्रसंगी केंद्रप्रमुख संजय जाधव,आदर्श गाव बल्लाळवाडीचे सरपंच संजय नायकोडी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र नायकोडी, लेण्याद्री विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका अनिता डोंगरे समस्त ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे,विस्तार अधिकारी सिंधू लोंढे व केंद्रप्रमुख स्वप्नजा मोरे व केंद्रप्रमुख पांडुरंग भौरले यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.सदर उपक्रमाची माहिती मुख्याध्यापिका पुष्पलता उकिर्डे यांनी दिली.सदर उपक्रम सांगता कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनिषा लोखंडे यांनी मानले .