(निवडणूक मतदान बहिष्कार)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या आदिवासी भागातील कोपरे,जांभुळशी, पुताचीवाडी,जोशीवाडी,अगवणेवस्ती,शैलाचा माळ, माळीवाडी,मांडवे,मुथाळणे,गावठाणावाडी,शिंदीफाटा, या गावांसह अकोले तालुका व जुन्नर तालुका यांच्या सरहद्दीवर असणारे गडदीचे(कपारींचे) गाव आणि नैसर्गिक चमत्कार यासाठी प्रसिद्ध ग म्हणून जे समजले जाणारे फोपसंडी गावामध्ये पिण्याच्या पाणी प्रश्न गंभीर झाला असून हक्काच्या पाण्यासाठी आदिवासी जनतेचा बांध फुटला असल्या मुळे अखेर ही जनता रस्त्यावर उतरली आहे तसेच आमरण उपोषणाचा इशारा देखील स्थानिक नागरिक रोहिदास पिलाजी देठे यांनी दिला आहे.
आमच्या जुन्नर तालुक्यातील पाच धरणांचे पाणी नगर जिल्ह्याला व बारामतीला जाते या धरणा– साठी आमच्या जमिनी गेल्या आम्ही भूमिहीन झालो आमच्यावर उपास मारीची वेळ आली आणि आम्हाला च प्यायला पाणी नाही आमच्या धरणांचे पाणी जर बाहेरच्या तालुक्यांना,जिल्ह्याला जात असेल तर अकोले तालुक्यातील येसनठाव धरणाचे पाणी आम्हाला का नको जोपर्यंत आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार असून येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीला मतदान करणार नसल्याचे याग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.
अति दुर्गम भागातील मांडवे,मुथाळणे,कोपरे, जांभूळशी या गावांमध्ये दिवसेंदिवस पाण्यासाठी आणीबाणी वाढत आहे या गावांमध्ये जल जीवन मिशन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे परंतु हे जल जीवन चे काम अकोले तालुक्यातील येसनठाव धरणाच्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी अडवल्यामुळे मुथाळणे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून अकोले तालुक्यातून जुन्नर तालुक्यात कामासाठी येण्यास नागरिकांना मज्जाव केला आहे वेळीच ही बाब ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे माहिती मिळाल्यामुळे त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तात्पुरते आंदोलन स्थगित केले आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले आहेत.:-जल जीवन योजनेचे काम बंद करण्यामागे आमदार डॉ.किरण लहामटे यांचा हाथ? मांडवे,मुथाळणे या आदिवासी भागातील जलजीवन मिशन योजनेचे काम हे जवळपास ८० टक्के पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यात आले आहे हा पाणीपुरवठा अकोले तालुक्यातील येसनठाव धरणातून होणार असल्यामुळे काही स्थानिक ग्रामस्थांनी आमदार डॉ,किरण लहामटे यांचे नाव सांगून हे काम बंद केले आहे खरंतर ही योजना केंद्राची असल्यामुळे याला तालुक्याच्या सीमेचा प्रश्न येतोच कुठे पाणी आणि रस्ते बंद करण्याचा हक्क कोणालाच नाही यामध्ये जर आमदारांचा हाथ असेल किंवा ग्रामस्थ आमदारांचे नाव सांगून दिशाभूल करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी मांडवे गावचे सरपंच दामोदर गोडे यांनी केली आहे.आणि जर तसे असेल तर कमीतकमी त्यांच्याच मतदार संघातील फोफासंडी गावची तहान भागविण्यासाठी एखादा टॅंकर सुरु करावा .