जुन्नर तालुका प्रतिनिधी :-रविंद्र भोर
उदापुर ता:-जुन्नर येथील एक माथेफिरू
गेली पंधरा दिवसांपासून डोके फिरल्या प्रमाणे घरासमोर पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर वक्र दृष्टीने पहात असून विनाकारण दुचाकींचे नुकसान करत आहे.उदापुर ता:-जुन्नर येथील वरील आळीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर हे रहात असून ते आपल्या ०३ दुचाकी सध्या उन्हाळ्यात आपल्या राहत्या घरा– समोर पार्क करीत असतात.त्या तीनही दुचाकींचे नुकसान झाले आहे.
याशिवाय या गल्लीत अनेक दुचाकी व चारचाकी वाहने सर्व गल्लीतच पार्क करतात मात्र गेली १५ दिवसांपासून एक माथेफिरू रात्रीच्या वेळी या दुचाकींतून पेट्रोल चोरणे,ज्या गाडीत पेट्रोल काढता आले नाही तर गाडीचे इंडिकेटर तोडणे,टायर मध्ये खिळे ठोकून पंक्चर करणे व हेडलाइट सह डोम फोडणे आणि जास्तीत जास्त गाडीचे पार्ट तोडून आर्थिक नुकसान करीत आहे.
याशिवाय चारचाकी गाडीचे कंपनी लोगो काढून चोरणे,बाटल्या फोडून दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या टायर खाली टाकून देणे,गाड्यांच्या बॉडीवर स्क्रॅच काढणे इत्यादि नुकसान करीत आहे.याबाबत माहिती मिळाली आहे की काही व्यक्तींच्या अनैतिक संबंधात अडसर निर्माण होत आहे म्हणून हे माथेफिरू
त्यांचा राग मनात धरून अशा प्रकारे दुचाकींवर व चारचाकीवर आर्थिक नुकसान करीत आहे.याबाबत जेष्ठ पत्रकार रविंद्र भोर यांनी उदापुर गावचे पोलीस पाटील अमित ठोसर यांना सांगितले असून ते याबाबत ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहेत.