जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

मंगळवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी एम्पॉहर फाउंडेशन च्या सेतू कार्यक्रम आणि प्राथमिक आरोग्य केंद्र काडाव यांच्या वतीने किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी कडाव येथे आरोग्य शिबिर राबविण्यात आले.

एम्पॉहर फाउंडेशन सेतू कार्यक्रमा अंतर्गत संस्थेमार्फत कडाव ग्रामपंचायत मधील कडाव बौद्धवाडा, कडाव कातकरवाडी येथील किशोरवयीन मुलींसोबत जीवन कौशल्य,आरोग्य आणि पोषण, लिंगभाव समता,आर्थिक साक्षरता या विषयांना अनुसरून प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.या विषयाला धरून सेतू कार्यक्रमा अंतर्गत योग्य अंमलबजावणी होण्यासाठी किशोरवयीन मुलींना गट प्रकल्प दिला जातो.

या गटप्रकल्पामध्ये किशोरवयीन मुली त्यांच्या आजूबाजूला येणाऱ्या समस्येवर काम करतात. एम्पॉहर फाउंडेशन संस्था रायगड जिल्ह्यात कर्जत, पेण, अलिबाग या तालुक्यात १५० पेक्षा जास्त गावांमध्ये हा प्रकल्प ‘सेतू’ नावाने चालवत आहे.प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून मुलींनी महिलांची आरोग्य विषयक समस्या म्हणजे महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळणारा आजार रक्तपांढरी म्हणजेच ॲनिमिया या विषयावर गट तयार करून काम केले. या गटप्रकल्पांतर्गत त्यांच्या परिसरातील महिलांना आणि मुलींना त्यांच्या रक्तात लोहाचे प्रमाण किती आहे,या बाबत मार्गदर्शन केले. त्याचाच पुढील टप्पा म्हणून दिनांक १६ मार्च २०२४ रोजी प्राथमिकआरोग्य केंद्र,कडाव यांच्या मदतीने मुलींनी हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्यात ५० पेक्षा जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराला कडाव ग्रामपंचायतीच्या सदस्य रेखा शिंदे,बचत गट अध्यक्ष जयश्री,आणि कडाव, कातकरवाडी व बौद्ध वाड्याच्या आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व सर्व कर्मचारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली. तसेच एम्पॉहर फाउंडेशन चे पदाधिकारी अमोल काळे भाग्यशाली हनुमंते,अर्जुन माळगे,दिशा ठाकूर,सविता पवार, मेघा करडे, पूजा कांबरी, सुप्रिया मोगारे, माधवी शिंदे,भाग्यश्री पवाळी देखील उपस्थित होते.कडाव येथील किशोरवयीन मुलींनी हे आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडावे यासाठी प्रयत्न केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button