जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

स्वीप मतदार जनजागृती अंतर्गत बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर नंबर १ येथे “मी मतदान करणार” शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ बाबत जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांचेमार्फत प्रचार व प्रसिद्धी बाबत कामकाज सुरु आहे.त्या अनुषंगाने १९५ जुन्नर विधानसभा,३६ शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृती साठी “मी मतदान करणार”हि शपथ रोहोकडी व बल्लाळवाडी केंद्रातील ८५ शिक्षकांनी घेतली.

सदर कार्यक्रमप्रसंगी ओतूर बीट विस्तार अधिकारी सिंधू लोंढे,रोहोकडी केंद्रप्रमुख प्रभाकर दिघे, बल्लाळवाडी केंद्रप्रमुख स्वप्नजा मोरे,मुख्याध्यापक लीला धिरडे,विजया हाडवळे,भगवान खंडागळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आरोटे यांनी केले तर आभार प्रभाकर दिघे यांनी मानले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button