शुभम वाकचौरे
जांबूत : ता. शिरूर दि.२३ अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय हनुमान’अशा गजरात जांबूत येथे हनुमान जयंती मंगळवारी विविध ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली.
जय हनुमान कला क्रीडा व सामाजिक मंडळाच्या वतीने भव्य हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंडळातील सभासदांनी अगदी सकाळपासून काटेकोरपणे नियोजन केले होते. पहाटे जय हनुमान प्रासादिक भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन व महाआरती नंतर महाप्रसाद व सायंकाळी भव्य मिरवणूक व शोभेचे दारूकाम व आकर्षक विद्युत रोषणाई अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती.
या कार्यक्रमा मध्ये महाबली हनुमानाच्या पात्राने सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणुकीमध्ये जांबूत गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, संचालक व गावातील प्रमुख मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मंडळातील अध्यक्ष रमेश राऊत,खजिनदार – संतोष रणसिंग गुरुजी, सचिव – संतोष राऊत, कार्याध्यक्ष – स्वप्निल चव्हाण, व सदस्य नितीन माने,जालिंदर डुकरे , अमोल चव्हाण, शेखर राऊत, आयुष राऊत,राजूशेठ लूनिया,दत्ता आतकर, स्वस्तिक राऊत, सुमित मुंडलिक, दिगंबर राऊत,सूचित राऊत, बाळूशेठ पवार, अशोक गाडेकर, मंगेश शहा, निखिल राऊत, अनिल जगताप , विनायक राऊत, सुमित जाधव, ऋषिकेश राऊत, अविनाश जाधव, प्रतीक सोमवंशी, सत्यम गायकवाड, कैलास जगताप, संदीप थोरात या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.जय हनुमान महिला नवरात्रोत्सव मंडळातील सर्व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते..