जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा ओतूर नंबर २,बीट – ओतूर,तालुका -जुन्नर ,जिल्हा – पुणे या ठिकाणी रोहोकडी केंद्राचा केंद्रपातळी वरील शाळा पूर्वतयारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सन २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणारे विद्यार्थीपालक, केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर दिघे मुख्याध्यापिका विजया हाडवळे,लीला धिरडे,अंगणवाडी सेविका, केंद्रातील शिक्षक वृंद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
नावनोंदणी,शारीरिक विकास,बौद्धिक विकास,सामजिक व भावनिक विकास,भाषा विकास, गणितपुर्व तयारी,साहित्य वाटप व मार्गदर्शन असे स्टॉल लावण्यात आले होते.विद्यार्थ्याना शाळेची आवड निर्माण व्हावी.या उद्देशाने स्टार प्रकल्प अंतर्गत सन २०२२ पासून शाळापूर्व तयारी उपक्रम सर्वजिल्हा परिषद शाळांमध्ये राबविला जात आहे.शाळा पूर्व तयारी कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून गणपत डोंगरे आणि सतीश नलावडे यांनी काम पाहिले कार्यक्रम प्रसंगी ओतूर नंबर २ शाळेतील सभागृह बाहेर विविध टेबल वर आकर्षक सजावट करून साहित्य मांडण्यात आले होते.
ओतूर बीट विस्तार अधिकारी सिंधू लोंढे गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.शाळा पूर्वतयारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षक वृंद,सर्व अंगणवाडीताई,पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.