पुणे प्रतिनिधी
दि. ८ एप्रिल २०२४सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,वडगाव बुद्रुक, पुणे व उच्चशिक्षण, ओवरसीज विभाग सिंहगड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदेशातील शिक्षण व आव्हाने या विषयावर एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे माध्यम प्रतिनिधी प्रा.तुषार काफरे यांनी सांगितले.
सदर कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून इम्पेरियल ओव्हरसीज एज्युकेशनल कन्सल्टंटच्या प्रमुख सल्लागार श्रीवस्य वैद्य, श्री ऋषिकेश जोशी, वरिष्ठ सल्लागार, ओव्हरसीज एज्युकेशनल कन्सल्टंट, पुणे, श्री परमवीर बधाने हे उपस्थित होते.उपस्थितांना मार्गदर्शन करताना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या विविध बाबी जसे की स्कॉलरशिप बँकलोन, व्हिसा व त्यासाठी लागणारी कागदपत्रे, विद्यापीठाची निवड या विषयावर सखोल माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी विद्यालयाच्या तृतीय वर्ष व चतुर्थ वर्ष अभियांत्रिकीमधून १२४ विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे उपप्रचार्य डॉ. वाय पी रेड्डी, महाविद्यालयातील सर्व विभाग व विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रसंगी प्रा. रुपम नवले यांनी कार्यशाळेचे नियोजन केले. श्रेयांगी एडके यांनी सूत्रसंचालन, तर ओव्हरसीज विभाग सिंहगड कॉलेज चे प्रमुख प्रा. अशोक विधाते यांनी प्रस्ताविक केले व आभार मानले.