(चैत्रातील सण व यात्रांमुळे फुलांना मागणी)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
चैत्र महिना सुरू झाल्याने अनेक सण उत्सव आणि यात्रा,जत्रांचा हंगाम सुरू झाल्याने विविध फुलांची मागणी वाढली आहे.मागील एक महिना फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र,नवीन मराठी वर्ष गुढीपाडवा चाहूल लागल्यामुळे झेंडू(गोंडा) व इतर फुलांना मागणी वाढल्याने दरात चांगली वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चांगल्या प्रकारे बाजार भाव मिळत असल्यामुळे अणे माळशेज परिसरातील फुलशेती करणारे शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे.
डिंगोरे,उदापूर,बनकरफाटा,बल्लालवाडी आलमे, नेतवड,माळवाडी,मढ,पिंपळगाव-जोगा, सांगणोरे, खिरेश्वर, सितेवाडी, तळेरान,ओतूर,रोहकडी, आंबेगव्हाण उंब्रज,इत्यादी भागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू व शेवंती सह विविध फुलांची ठिबक,मल्चिंग आदीचा वापर करून आधुनिक पद्धतीने लागवड करतात.रोपांच्या लागवडी नंतर तीन ते चार महिन्यांत शेवंतीच्या फुलांचा तोडणी हंगाम सुरू होतो. तर झेंडूचा दोन महिन्यांत चालू होतो.बाजारभाव चांगले मिळत असल्याने उत्पादकांना चांगले दिवस आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील १५ दिवसांपासून फुलांची भाव वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांनी प्रतवारी व रंगानुसार झेंडूच्या फुलांची प्रति किलोग्रॅम ३० ते ६० रुपये बाजारभावाने खरेदी केली जात आहे. बाजारभावात सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. अणे माळशेज परिसरात जवळपास ७०० ते ८०० हेक्टरव फूल शेती केली जाते. कितीही आर्थिक संकटे आली तरी येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या फुलशेती शेती करत आहेत. सणासुदीच्या कालावधीत फुलांना वाढीव भाव मिळत असल्याने बागायती भागातील शेतकरी फूल शेतीकडे आकर्षित झाले आहेत या परिसरातील झेंडू, गुलाब, ऍस्टर, गुलछडी, लिली आदी फुले विकत घेण्यासाठी सणासुदीला फुल व्यापारी शेतावरच माल खरेदीसाठी येता असतात.
:-शेतकरी अडचणीत नाही:-डिंगोरे ता:-जुन्नर येथील माजी सरपंच संदीप बबन मंडलिक यांनी आपल्या एक एकर शेतीपैकी तीस गुंठ्यात कलकत्ता जातीचा झेंडूची(गोंडा) ५२०० रोपं साधारणतः १:५० रुपये विकत घेऊन दोन महिन्यापूर्वी लागवड केली त्यासाठी त्यांनी मल्चिंग कागद,ठिबक व खते प्रथम तोडणी पर्यंत असे चाळीस हजार रुपये खर्च करून उत्तम बाग फुलविली असून आता फुलांची तोडणी सुरू झाली असून आता पर्यंत तीन तोडे झाले असून प्रथम तोडा ३०/- रुपये किलो ने ७५००/-रुपये, दुसरा तोडा ५०/- किलो ने १००००/-रुपये तर तिसरा तोडा ६०रुपये किलो ने २००००/-रुपये झाले असून अजून १० तोडे होणार असून पुढील काळात बाजारभाव वाढते रहाणार असून या माझ्या तीस गुंठ्यात साधारणतः २,५०,०००/- हजार रुपये होतील त्यामुळे सर्व खर्च वजा जाता तीन महिन्यात १,५०,०००/-नफा मला मिळेलच त्यामुळे शेती योग्य पिकांचे उत्पादन व नियोजन करून केल्यास शेतकरी अडीच येणारच नाही मात्र केवळ उंटावरून शेळ्या हाकणारे व सरकारला नावे ठेवणारेच अडचणी असतात असे माझे मत आहे
:–संदीप बबन मंडलिक :–माजी सरपंच, डिंगोरे