(संकल्प डिसेंट फाउंडेशनचा कॅन्सर मुक्तीचा)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर 1
तुम्ही कुटुंबाचा आधार आहात,आजार लपवू नका.आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी बेस्ट कॅन्सरची तपासणी करून घ्या.डॉक्टर अमेय डोके रविवार दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी वडगाव सहाणी येथे डिसेंट फाउंडेशन पुणे व इनरव्हील क्लब ऑफ नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी शिबिरामध्ये डॉक्टर अमेय डोके महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी ३८ महिलांची तपासणी करण्यात आली
.महिलांच्या शरीरावरील कोणताही गाठ,व्रण हा कॅन्सर नसतो.मनात भीती व लाज न बाळगता तपासणी करून घ्या.पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये कॅन्सर असेल तर तो बरा होतो.काळजी न करता आपली आरोग्य तपासणी निसंकोचपणे करून घ्या. कारण तुम्ही कुटुंबाचा आधार आहात.तुम्ही सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित असा मौलिक सल्ला डॉक्टर अमेय डोके यांनी महिलांना मार्गदर्शन करताना दिला. आपल्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच मी जर आजारी पडले तर माझ्या कुटुंबाकडे कोण लक्ष देणार या भावनेतून बहुतांश महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत आणि मग कॅन्सर सारखा आजार तिसऱ्या चौथ्या अवस्थेत गेल्यावर त्यावर उपचार होत नाहीत व रुग्ण दगावण्याची शक्यता असते.म्हणून महिलांनी वेळेत ब्रेस्ट कॅन्सर ची पूर्व तपासणी करून घ्यावी असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ नारायणगाव च्या चार्टर्ड प्रेसिडन्ट अंजली खैरे यांनी केले.
या प्रसंगी डॉ अमेय डोके,डिसेंट फौंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,सचिव फकीर आतार, इनरव्हील क्लब ऑफ नारायणगावच्या चार्टर्ड प्रेसिडेंट अंजली खैरे,सरपंच वैशाली तांबोळी,संचालक आदिनाथ चव्हाण,सेक्रेटरी रश्मी थोरवे,खजिनदार सुनीता चासकर,युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष खंडू शिंदे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मधुकर भोर,तपासणी तज्ञ सपना बेलवटे,शुभांगी आराख,मदन वाबळे,पंकज शिंदे,मंगेश वाबळे,कल्याणी वाबळे,प्राथमिक शिक्षक राजेंद्र बेलवटे आदी मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
:—-;ज्या तपासणीसाठी अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत खर्च येतो.ती बेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले