जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये भूगोल विभागाच्या वतीने जी.आय.एस प्रणाली मध्ये करियर व व्यवसायच्या संधी या विषयावर अभिजित घुले,संचालक जीओकॉस्ट इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि भोसरी,पुणे,यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले अशी माहिती कोर्स समन्वयक डॉ निलेश काळे यांनी दिली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वी गोल पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते अभिजित घुले यांनी आपल्या भाषणात विद्यार्थीना जी आय एस प्रणालीचा नैसर्गिक संसाधने विकास, संसाधन उपभोग,डिजिटल मॅपिंग,ड्रोन सर्वे,कॅडस्ट्राल मॅपिंग,भुजल शोध,पृथ्वीच्या अंतरंग अभ्यास इत्यादी क्षेत्रात अँप्लिकेशन कशा प्रकारे केले पाहिजे ते नमूद केले सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे, उपप्राचार्य,डॉ के डी सोनावणे,डॉ अनिल लोंढे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ.रमाकांत कसपटे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ अमोल बिबे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार डॉ निलेश काळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ विनायक कुंडलीक, नितीन गरुड आणि विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.