(पुणे जिल्ह्यात कृषी विभागाचा पहिला प्रयोग)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
डिंगोरे ता:-जुन्नर येथे महाराष्ट्र शासन सोयाबीन मूल्य साखळी अंतर्गत जिल्ह्यामधील शासकीय पहिला ड्रोन टायगर झोन फार्मर प्रोडूसर कंपनी यांना उपलब्ध झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सतीश शिरसाट तांत्रिक अधिकारी प्रमोद बनकर तालुका अधिकारी गणेश भोसले वाडा तालुका अधिकारी हरीश महाकर मंडळ अधिकारी प्रवीण नंदकुले यांनी मोका तपासणी करून शेतकऱ्यांना या ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले.
विभागीय उपाधिकारी सतीश शिरसाट यांनी भविष्यामध्ये शेतकरी व शेती मध्ये फार्मर कंपन्या व फवारणीसाठी ड्रोन हे किती महत्त्वाचे आहेत यावर मार्गदर्शन केले यावेळी टायगर झोन कंपनीचे चेअरमन दत्तात्रय गबाजी लोहोटे माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र उकिर्डे,प्रताप लोहोटे,वैभव पाडेकर,उपसरपंच निलेश लोहोटे,राजशेखर शेरकर,विनायक लोहोटे, सभासद शेतकरी उपस्थित होते संदीप शिंगोटे यांनी सूत्रसंचालन केले व माजी सरपंच संपत लोहोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.