शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार

रांजणगाव गणपती येथे दि ०२ व ०३ एप्रिल रोजी अनंत विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्याजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम हा सुखकर्ता लॉन्स, पुणे नगर रोड, रांजणगाव गणपती, तालुका शिरुर, जि. पुणे ४१२२०९ या ठिकाणी होणार आहे. मंगळवार दि. ०२ रोजी सकाळी ठिक ९ वाजता जगदगुरुश्रीचे संतपिठावर आगमण झाल्यानंतर स्वागत समारंभ होईल व त्यानंतर लगेच जगदगुरुश्रीच्या प्रवचनाला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ नंतर दर्शन व समस्या मार्गदर्शन सोहळयास सुरुवात होणार असून समस्या मार्गदर्शन सोहळा संध्याकाळ पर्यंत असणार आहे त्याच दिवशी उपासक दिक्षाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि.०३ रोजी सकाळी जगदगुरुश्रीचे संतपिठावर आगमण झाल्यानंतर सुरुवातीला आरती होईल.

तसेच अमृतरुपी प्रवचण झाल्यानंतर समस्या मार्गदर्शन व दर्शन व तसेच त्याच दिवशी साधक दिक्षाचा कार्यक्रम होणार आहे. असा हा एकूण दोन दिवसाचा भरगच्च कार्यक्रम होणार असून सदरील कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विविध जिल्हयातून भाविकांची गर्दी होणार आहे. दोन्ही दिवसाकरिता भाविकासांठी महाप्रसादाची सोय केली असून मोठ्या प्रमाणात भाविकांनी महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहान जगदगुरु नरेंद्राचार्याजी महाराज संस्थान उपपिठ प. महाराष्ट्र पिठाचे पिठ प्रमुख श्री संजय गाडेकर तसेच पीठ व्यवस्थापक श्री सुधांशु जाधव यांनी केलेले आहे.संस्थाना मार्फत अनेक समाजिक शैक्षणिक वैद्यकीय कृषीविषयक अनेक उपक्रम मागील अनेक वर्षापासुन मोफत राबविले जात आहेत.

आजतागायत संस्थानामार्फत महाराष्ट्रातील विविध हायवेवर एकुण ५२ रुग्णवाहिका अपघातग्रस्त रुग्णांना मोफत सेवा देत असून आजपर्यंत या रुग्णवाहिकाच्या माध्यमातून २१५०० लोकांचा जीव वाचवला आहे. तसेच नाणिज येथे पदवीपर्यंत इंग्लिश माध्यमाची शाळा असून पदवीपर्यंत इंग्लिश माध्यमातून गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जात आहे. वैद्यकीय उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत संस्थानाच्या पुढाकारामुळे एकूण ५३ लोकांचे मरणोत्तर देहदान झालेले आहे. तसेच ब्लड इन नीड या वैद्यकीय उपक्रमाच्या माध्यमातुन जवळपास २०००० रुग्णांना मोफत रक्त देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत. संस्थानाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमामध्ये ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम, शेक्षणिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण आपतकालीन मदत कार्य असे विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत असून विविध सामाजिक कार्यात संस्थान नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button