प्रतिनिधी : सचिन थोरवे

अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मा.बाळकृष्ण कवडे,उपाध्यक्ष तुषार कवडे.सचिव सुनील घेगडे,विश्वस्त विक्रम कवडे,विनायक जाधव, शिल्पा जगदाळे,विनायक मांडे,संतोष कवडे,समीर मांडे व ग्रामस्थ यांच्या शुभाहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले.मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली.

महाआरतीचा मान गणेशभक्त योगेश गवारी,प्रभाकर बनकर,शरद काशीद,निखील काळे,प्रशांत ढोने यांना मिळाला .पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.३० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात आली.आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री. विघ्नहर् गणपती देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र ओझर तर्फे श्री विघ्नहर मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख व श्री विघ्नहरासमोर द्राक्षची आरस करण्यात आली .

तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. व येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,शुद्ध पिण्याचे पाणी,अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष ,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान ,चप्पल stand पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.सायंकाळी ७.०० वा. नियमित हरिपाठ करण्यात आला. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प.नंदू महाराज गावडे येडगाव,यांचे हरिकीर्तन झाले.त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळा शिरोली यांनी दिली. आजचे अन्नदाते संतोष शांताराम कवडे,ओझर यांनी चतुर्थीचे वारकरी अन्नदान केले.सायंकाळी ७.०० वा धुपारती होऊन रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले. आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी विकास कामात सहभागी होवून ट्रस्ट ला देणगी दिली. तसेच आलेल्या भाविकांमध्ये योगेश गवारी, यांनी २१००० देणगी दिली.

आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे.,उपाध्यक्ष तुषार कवडे सचिव सुनील घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे,विश्वस्त प्रकाश मांडे,सुर्यकांत रवळे,विक्रम कवडे,गोविंद कवडे,समीर मांडे,विनायक मांडे,विलास कवडे,संतोष कवडे,समीर मांडे,विनायक जाधव,मंगेश पोखरकर ,सौ.शिल्पा जगदाळे, यांनी केले.गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button