प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
पुस्तकमैत्री बुक गॅलरी राजगुरुनगर या बुक गॅलरीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त बुक गॅलरीच्या संचालिका सौ. मयुरी भवारी यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. तीन गटांमध्ये ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आठवी ते बारावी इंग्रजी आणि मराठी अशा दोन गटांसाठी मला आवडलेले पुस्तक हा विषय देण्यात आला होता. तर खुल्या गटासाठी मला आवडलेला लेखक हा विषय देण्यात आला होता. 300 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
खुल्या गटामध्ये
प्रथम क्रमांक .
सौ. आश्विनी संदीप वाडेकर (राजगुरूनगर ) द्वितीय क्रमांक
सौ सरिता अजय कळढोणे (जुन्नर)
तृतीय क्रमांक
सुरेखा मोहन सोनवणे (कात्रज) तसेच उत्तेजनार्थ
श्रीम. सुनीता बाळासाहेब खर्डे आणि श्रीम. अर्चना मोहन वाघमारे यांनी पटकावला. आठवी ते बारावी या गटातील मराठी विभागांमध्ये
प्रथम क्रमांक
पायल विपुल दिगंबरे (कोल्हापूर)
द्वितीय क्रमांक
प्रियदर्शनी शहाजी इंगळे (खराबवाडी ) तृतीय क्रमांक
सात्विक दत्तात्रय भोकसे ( राजगुरुनगर ) तसेच
उत्तेजनार्थ
समृद्धी सतीश मंडलिक आणि पूर्वा कुंडलिक पाटोळे (दोंदे ) यांनी मिळवला. तसेच
आठवी ते बारावी इंग्रजी विभागांमध्ये प्रथम क्रमांक
आदित्य निकम
द्वितीय क्रमांक
आभा प्रतीक खिसमतराव (राजगुरुनगर) तृतीय क्रमांक अनन्या प्रदीप घुमटकर (राजगुरुनगर) तसेच
उत्तेजनार्थ
श्रुती अनिल दाभाडे आणि समृद्धी अनिल सोसे यांनी पटकावला.
या स्पर्धेसाठी श्री. संजय सुपे, श्री. कांताराम खामकर, श्री. विजय लोखंडे, सौ. पायल चौधरी, डॉ. भीमराव केंगले, डॉ. ऋषिकेश नांगरे, डॉ. शितल खिसमतराव, डॉ. नीलम गायकवाड, डॉ. कुंतल जाधव, लेखक मनोहर मोहरे, सौ सुवर्णा विरणक, डॉ. अमोल वाघमारे, श्री. दत्तात्रय सावंत या मान्यवरांनी स्पर्धेच्या बक्षिसासाठी विशेष सहकार्य केले. तसेच डॉ. संजय शिंदे आणि डॉ. गणेश सोनवणे यांनी या निबंध स्पर्धेचे परीक्षण केले.