जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर


उदापुर ता:-जुन्नर येथील जिल्हा परिषद केंद्र
शाळेत डिसेंट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक आणि लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष जितेंद्र बिडवई व याच संस्थेचे सचिव फकिर आत्तार तसेच याच जिल्हा परिषद केंद्रशाळेचे सलग १० वर्षे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर यांनी गुरुवार दि:-२१ मार्च रोजी सदिच्छा भेट दिली.


उदापुर येथील स्वर्गीय शंकर शिंदे यांच्या साडेपाच महिन्याच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात डिसेंट फाउंडेशन च्या वतीने जेष्ठ पुरुष व महिला यांना एक काठी आधाराची वाटप करण्यात आले याशिवाय उपस्थित हृदय रोग निदान शिबीर संपन्न झाले यावेळी मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजलीअर्पण केल्या नंतर जिल्हा परिषद शाळा शिक्षक सत्यवान म्हस्के यांनी शाळेला सदिच्छा भेट देण्याची विनंती मान्य करून भेट दिली.


यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक फापाळे यांनी सहकारी शिक्षक सत्यवान म्हस्के,सुनिल चौधरी,स्मिता डुंबरे,उर्मिला चौधरी यांनी सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार केला यावेळी संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी या शाळेसाठी आवश्यक गरज असणाऱ्या सुविधा पुरविण्यासाठी निश्चित मदत करु असे सांगितले आज पर्यंत आमच्या फाउंडेशन च्या मदतीने अनेक शाळांना सहकार्य केले आहे. आपल्या उदापुर केंद्रशाळेचे देखील रूप आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून योग्य त्या भौतिक,शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे असे फकिर आत्तार म्हणाले.
यावेळी सूत्रसंचालन सत्यवान म्हस्के यांनी तर आभार सुनिल चौधरी यांनी केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button