पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि दुष्काळात पाण्याचं योग्य प्रमाणात वापर व्हावा यासाठी शिरोली बु गावातील न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक मध्ये नैसर्गिक रंगाची मुक्त उधळण.
प्रतिनिधी : सचिन थोरवे
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु या शाखेत राष्ट्रीय हरित सेना सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत. 25 मार्च धुलिवंदन निमित्त विद्यालयात नैसर्गिक रंगाची निर्मिती करण्यात आली. विद्यालयाच्या पर्यवेक्षक सौ अनघा घोडके यांनी मराठी महिने त्यातील चैत्र ,फाल्गुन, वसंत महिन्यात होणारे निर्सगातील बदल. निर्सगाने मुक्तपणे केलेली विविध रंगाच्या फुलांची , फळांची, पानांची उधळण. वृक्षांनी पालवी रुपी केलेला श्रृंगार व सजलेला निसर्ग. व विद्यार्थ्यानी तयार केलेल्या सर्व नैसर्गिक रंगाची पाहणी केली. सध्या वापरण्यात येणारे रासायनिक रंग व त्यामुळे होणारे डोळ्यावर व त्वचेवर होणारे भयंकर परिणाम. नैसर्गिक रंगांचा वापर करा व रासायनिक रंग हद्दपार करा हा संदेश विद्यार्थ्यां कडून देण्यात आला. सध्या पाण्याची टंचाई पाहता कोरडा रंग वापरा व पर्यावरणाला मदत करा हि माहिती राष्ट्रीय हरितसेना प्रमुख श्री देवकुळे एस व्ही यांनी दिली .
इ 6 वी ब च्या 33 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. बीट, पालक, गुलाबाच्या पाकळ्या, सिताफळाची पाने, झेंडूची पिवळी व केशरी रंगाची फुले, काटे सायराची फुले, ब्रोकली, हळद, सूर्यफूल, कृष्ण तुळस पाने, हे उन्हात वाळवून त्यांची वस्त्रपूड करून त्यांचे कोरडे व ओले रंग तयार केले.
विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक श्री भालिंगे व्ही एस व वर्ग शिक्षिका सौ धादवड आर के यांनी उपक्रमात सहभाग घेतला. तर इ 6 वी ब च्या साई ढोमसे , आयुष नलावडे, श्लोक विधाटे, साई बोऱ्हाडे, पार्थ बोऱ्हाडे, विराज विधाटे, , वेदांत नवले, प्रणव नवले, मयांक विधाटे, पवन गंगुले, अमित नायकोडी, स्वराज मोरे , प्रथमेश पारवे , रोहन भोजणे, समर्थ बोचरे, हर्षवर्धन विधाटे , मयूर राठोड, विराज ढोमसे, सिद्धार्थ सोमोशी ,आर्या ढोमसे, , संस्कृती ढोमसे, शर्वरी नवले , संस्कृती शिंपणकर, राजश्री केदार, प्रतिक्षा फुंदे, , आराध्या थोरवे, संस्कृती ढोमसे, समृद्धी थोरवे, तनिशा हांडे, आदिती जगताप, स्वरा शिंदे, स्वराली जाधव, सिध्दी बोऱ्हाडे या विद्यार्थ्यांनी चित्रकला विषया अंतर्गत रंगनिर्मिती केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा श्री प्रसाद हांडे सर यांनी हि माहिती दिली.