शिरूर प्रतिनिधी – शकील मनियार
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंगलताई कौठाळे यांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मंगलताई कौठाळे यांनी आपल्या सरपंच काळामध्ये गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भरीव असे कार्य केले. तसेच गावातील रस्त्यांची दुरुस्ती असेल स्मशानभूमीचे सुभीकरण करणे महिला बचत गटांसाठी त्यांना मार्गदर्शन करणे वीट भट्टी महिला कामगारांना साडी वाटप गावातील शाळेत संगणक भेट किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन रक्तदान शिबिराचे आयोजन व विविध आरोग्य शिबिरे राबविणे तसेच आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेमार्फत विविध उपक्रम त्यांनी केले. दिल्ली या ठिकाणी आदर्श सरपंच म्हणून सन्मानित करण्यात आले अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे चांगले कार्य पाहून त्यांच्या कार्याची दखल घेऊन द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरूर तालुक्याच्या वतीने त्यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 2024 चा स्त्री शक्ती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पीआय ज्योतीराम गुंजवटे द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, अहमदनगर खरेदी विक्री संघाचे संचालक बाबासाहेब काळे, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत साठे,पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान, तालुकाध्यक्ष शकील मणियार ,तालुका उपाध्यक्ष विवेकानंद फंड माजी आदर्श सरपंच तात्यासाहेब सोनवणे, ॲड. रवींद्र खांडरे माजी उपसरपंच निलेश सोनवणे, युवा उद्योजक कमलेश बुऱ्हाडे ,पत्रकार फैजल पठाण ,पत्रकार फिरोज सिकलकर, संचालक संतोष लटांबळे आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.