शुभम वाकचौरे
फाकटे : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व कृतीयुक्त उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी आज शनिवार दिनांक ९ मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संकल्पनेतून ज्ञानरचनावादी उपक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रतक्ष्य अनुभव घेता आला.या बाल आनंदी बाजारात मुख्य आकर्षण वडापाव, भजी, भेळ, चहा, स्टेशनरी बिस्किटे, स्विट, किराणा, फळे, भाजीपाला व अश्या अनेक गोष्टी उपलब्ध होत्या. एकुण १०-१५ हजार रुपयांची उलाढाल या बाजारात झाल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. एकनाथ राळे यांनी दिली. जिल्हा परिषद शाळेत मुलांनी भरवलेल्या आनंदी बाजारात पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
सदर उपक्रमाची यशस्वी अमलबजावणी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश काळे सर व शाळेतील शिक्षकांनी केल्याने गावचे सरपंच सौ. रेश्माताई पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.