(माळशेज परिसरात सुरू झाली रसवंतिगृह)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
मार्च सुरू झाला आणि उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच जुन्नर तालुक्याच्या माळशेज पट्ट्यातील ग्रामीण भागात सर्वत्र रसवंती गृहाच्या चाकांनी अधिक वेग घेतला असून तहानेने व्याकुळ झालेल्या ग्राहकांना ऊसाचा रस पाजण्यासाठी चाके गतीने फिरताना दिसत आहे. मात्र जोपर्यंत उन्हाचे चटके जाणवत नाही; तोपर्यंत ग्राहक वळत नाही असे चित्र निर्माण होत असते.परंतु गेल्या महिन्यात अचानक तापमानात घट झाली आणि थंडीचा कडाका वाढला होता.आता मात्र थंडी गायब झाल्याचे दिसत असल्याने उन्हाळ्याची चाहूल माळशेज परिसरात गावागावांत लागल्याचे जाणवत आहे. बनकरफाटा ता:-जुन्नर येथे गेले दोन वर्षांपासून अशोक दिघे व भारती दिघे या सुशिक्षित दाम्पत्याने गारवा नावाने एक रसवंतीगृह सुरु केले असून भर उन्हाळ्यात तहानेने कासावीस झालेल्या प्रवाशांना त्यांची तृष्णा भागविण्यासाठी हे गारवा रसवंती केंद्र आकर्षित करत आहेत.बनकरफाटा हे सध्या वेगाने विकसित होत असून चारही दिशांनी व खासरून जुन्नरतालुक्यातील पर्यटन स्थळांना भेट देताना तसेच मुंबई, नगर,नाशिक,पुणे याभागातून येताना किंवा जाताना पर्यटकांना व प्रवाशांना बनकरफाटा येथे यावेच लागतेत्यामुळे या ठिकाणी या गारवा रसवंती केंद्रातील रसाचा आस्वाद घेतातच.
पूर्वी याच बनकरफाटा ठिकाणी लाकडी चरक (गुऱ्हाळ)असायचे येथे ऊसाचा रस,काकवी,गुळजे बैलाच्या मदतीने निर्माण होत असे,आता मात्र लाकडी घाना हद्दपार झाले असून सध्या त्यांची जागा आधुनिक यंत्रसामग्रीने घेतली असून अगदी छोट्या आकारात तर मोठ्या आकाराच्या उसरस यंत्र फायदेशीर ठरत आहेत.एकमात्र निश्चित वाढत्या लोकसंख्येची तहानभूक यांत्रिक झाली आहे.माळशेजपट्ट्यातच नव्हे तर जुन्नर तालुक्याच्या सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात अनेक तरुण मंडळी या सिजनेबल व्यवसायात आपले नशिब आजमवताना दिसून येत आहेत.
कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात ही रसवंतीगृहे दिलासादायक वाटत असल्यामुळे या शीतपेयांना व रसवंतीगृहामध्ये दरवर्षी ग्राहकांची गर्दी वाढत आहे. थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, उसाचा रस, ज्यूस, आईस्क्रीम, रसवंती, बर्फगोळा, कुल्फी, फळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दुकाने आता यापुढे कडक उन्हाळ्यापूर्वी सुरू होतील अशी तयारी देखील या दुकानदारांची दिसत आहे.फेब्रुवारी महिन्यात उन्हाचे चटके कमी जाणवत असतात तरी तापमान कमी असताना सुद्धा रसवंतीगृह दुकानात गर्दी दिसून येत होती.आता मार्च हिट सुरु झाल्याने उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा व तहान भागविण्यासाठी सरबत, उसाचा रस, आईस्क्रीम, कुल्फी, लिंबू सरबत यांसारख्या थंड पदार्थांची दुकानेविविध ठिकाणी थाटलेली दिसतात.सध्या थंडपेयांना मागणी कमी असली तरी पुढील महिन्यापासून चांगली सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.उन्हाची तीव्रता वाढत जाईल त्याप्रमाणे नागरिक आईस्क्रीम खाणे जास्त पसंत करतात. बाजारात विविध प्रकारचे म्हणजेच काजू, पिस्ता, केशर, यासारखे आईस्क्रीम उपलब्ध होतात कांडी आईस्क्रीम,मलई आईस्क्रीमसह बर्फाच्या गोळ्याचे आकर्षण,बर्फगोळा लोकप्रिय उन्हाळ्यात बच्चे कंपनीला बर्फाच्या गोळ्याचे भलते आकर्षण असते.विविध रंग,चवीत उपलब्ध असलेला गोळा ज्येष्ठांमध्येही लोकप्रिय आहे.त्याचबरोबर कांडीची आईस्क्रीम व वडाच्या पानावरील मलई आईस्क्रीमला देखील चांगली मागणी आहे.साधा गोळा, मावा गोळा, आईस प्लेट यांसारखे प्रकार यात उपलब्ध होतात.तरीही बर्फगोळ्याचे महत्त्व अद्याप टिकून आहे.बर्फाचा गोळा घेण्यासाठी लहान मुले गाड्यांभोवती गर्दी करीत असल्याचे नेहमी या परिसरात दिसते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळा कडक जाणवत आहे असे माळशेज परिसरातील नागरिक सांगत आहेत.