(राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे दोनदिवसीय आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
१२ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या आरोग्य फिल्म महोत्सवात शून्य सर्पदंश प्रकल्पा अंतर्गत विषारी सर्पदंश उपचार व त्याचे दुष्परिणाम या माहितीवर नारायणगाव येथील विघ्नहर मेडिकल फाउंडेशनने तयार केलेल्या सीमा मुरलीधरन दिग्दर्शित ‘मिशन इम्पॉसिबल’ या माहिती– पटास राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक मिळाला अशी माहिती विघ्नहर मेडिकल फाउंडेशनचे सर्पदंशतज्ञ डॉ सदानंद राऊत व पल्लवी राऊत यांनी दिली.
पी. एम. शहा फाउंडेशनच्या वतीने पुणे येथील एनएफडीसी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे दोन दिवसीय आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते.या महोत्सवाचे उद्घाटन स्मिता पाटील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे संस्थापक,संचालक डॉ.अभिजित वैद्य यांच्या हस्ते झाले.महोत्सवात आरोग्यविषयक लघु चित्रपटांचे सादरीकरण केले.या महोत्सवात भारत,जर्मनी,अमेरिका,बांगलादेश, पाकिस्तान,इंग्लंड, फ्रान्स,फिलिपाईन्स,सिंगापूर,लंडन, ऑस्ट्रेलिया आदी देशातील विविध विषयांवरील लघुपट व माहितीपटांचे सादरीकरण केले.
नारायणगाव येथील विघ्नहर मेडिकल फाउंडेशनचे जागतिक विषबाधा व सर्पदंशतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, डॉ.पल्लवी राऊत यांनी विषारी सर्पदंशावर तयार केलेल्या ‘मिशन इम्पॉसिबल’ या माहितीपटास राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले.प्रसिद्ध फिल्ममेकर वीरेंद्र वळसंगकर, महोत्सव संचालक चेतन गांधी यांच्या हस्ते डॉ. सदानंद राऊत व डॉक्टर पल्लवी राऊत यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान केले. या वेळी शहा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेला ‘स्कूल सॅनिटेशन प्रोग्रॅम’ यशस्वीपणे राबविलेल्या पाच शाळांचा विशेष सन्मान वळसंगकर यांच्या हस्ते करण्यात आला.परीक्षक विनय जवळगीकर,रश्मी आगरवाल यांचाही वेळी सन्मान केला.मोनिका जोशीनी सूत्रसंचालन केले.”कोणताही विषय नेमक्या पद्धतीने मांडता येणे, ही लघुपट, माहितीपटांची खरी ताकद आहे, लघुपट, माहितीपट समाजापर्यंत प्रभावीपणे आशय पोचवतात. डॉ.राऊत दांपत्याने शून्य सर्पदंश हा महत्वाकांक्षी व अवघड प्रकल्प ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविला आहे””. – वीरेंद्र वळसंगकर,प्रसिद्ध फिल्ममेकर””रुग्णांवर मागील तीस वर्षांपासून उपचार करत आहे. विषारी सर्पदंश झालेल्या सुमारे बारा हजार रुग्णांना जीवदान दिले आहे नाग,मण्यार,फुरसे,घोणस या अतिविषारी सर्पदंशाची लक्षणे भिन्न आहेत.मागील तीस वर्षांच्या अनुभवातून मिळालेल्या माहितीच्या आधारे शून्य सर्पदंश प्रकल्प तयार करून राज्य शासनाला सादर केला आहे. या माध्यमातून विषारी सर्पदंशाच्या जाती,लक्षणे,उपचार आदी बाबतची माहिती देऊन प्रबोधन केले आहे.या माहितीपटाला राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळाल्याने या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
डॉ.सदानंद राऊत:–जागतिक विषबाधा व सर्पदंशतज्ञ.