जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर

फोफसंडी ता:-अकोले या अतिदुर्गम खेड्यात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत मंगेश कोंडार यांनी प्रस्ताविक भगवंता घोडे यांनी.राजू घोडे अनुमोदन केले.कविवर्ययशवंत घोडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.आदिवासी क्रांति कारक प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नंतर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.

काव्यवाचन मध्ये नामवंत कवींनी आपल्या कविता सादर केल्या.आदिवासी संस्कृती वर आधारित भलरी गायन उमाबाई वळे यांनी सुंदरपणे सादर केले. त्यामध्ये निसर्ग कवी तानाजी सावळे यांनी आपली निसर्गा विषयी कविता सादर केली.अँड जयराम तांबे यांनी कविता सादर केली.यशवंत घोडे यांनी शोकांतिका हि कविता सादर केली.प्रा.अभिनेत्री शालिनी शहाने यांनी कविता सादर केली.त्यानंतर हरिभाऊ घोडे यांनी आपले मनोगत व कविता सादर केली . त्यानंतर श्रीकांत चौगुले( इतिहास व लेणी तज्ञ,पुणे)यांनी फोफसंडी गावचा गुण गौरव केला.

कार्यक्रम अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे म्हणाले,”फोफसंडी गाव जगाच्या नकाशावर कसे जाईल यासाठी प्रयत्न करावे.पर्यटन विकसित होऊन स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी आहे.निसर्गाची उधळण येथे आहे.पर्यटकांना येथे खेचून आणण्याची ताकत येथिल निसर्गरम्य परिसरात आहे.गावकऱ्यांचा सत्कार म्हणजे शबासकीची थाप आहे.भविष्यात हे फोफसंडी जगप्रसिदध होणार आहे.”प्रमुख पाहुणे अॅड जयराम तांबे यांनी गावाचा विकासाबाबत मनोगत व्यक्त केले.आपल्या काव्यरचनेतून काव्य- मैफलीत रंग भरला.

विशेष अतिथी श्रीकांत चौनगुले म्हणाले,” फोफसंडी या गावाला येऊन अतिशय आनंद झाला आहे.महाराष्टाचे माँरिशिअस म्हणून या गावाचा उल्लेख येतो.मी माँरेशिअसला गेलो होतो.अगदी छोटे बेट आहे.तेथे अनेक मराठी माणसे आहेत.तेथे खुपच सृष्टीसौदर्य आहे.फोफसंडीत आल्यावर सुध्दा येथिल निसर्गपाहुन फोफसंडीला का माँरेशिअस म्हणतात याची जाणीव झाली.सामाजिक भान जपणारी नक्षञाचं देणं काव्यमंच हि संस्था आहे.त्याच्या माध्यमातून आज काव्यमैफल,विद्यार्थी सत्कार,ग्रामस्थ सत्कार,मुलांना खाउ वाटप केला.यामुळे समाधान वाटले.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी वादळकार प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी गावात सरकारी दवाखाना व बस सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.शालीनी सहारे मुलांसाठी गोष्टी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले. नक्षत्रांचं देणं काव्यमंच कवी ग्रुपच्या वतीनेविद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व खाऊ देण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मुठे यांच्या हाँटेलमध्ये जेवण्याची सोय केली.या कार्यक्रमासाठी जि.प.शाळा फोफसंडी येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.त्यांचे कौतुक करावं तेवढं कमी नाही विशेष म्हणजे सुट्टी असूनही उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी गावचे ग्रामसेवक गोडे भाऊसाहेब,सरपंच सुरेश वळे,उपसरपंच संजय घोडे ,ग्रा.सदस्य दगडू भगत,ग्रा.सदस्या मिना मुठे मा.पो सोमा वळे, सह्याद्री पथिकालय हाॅटेलचे मालक दत्तात्रय मुठे,दुध डेअरी चेअरमन पोपट वळे,आशा- वर्कर कांताबाई घोडे,वाळीबा वळे,बुधा वळे,सखाराम वळे,बुधा घोडे,सिताराम घोडे,कोंडीबा घोडे,भिवा वळे, गणपत वळे,धनंजय वळे,साळू घोडे,साळू वळे , नक्षत्राचं देणं काव्यमंचचे इतर मान्यवर कवी तसेच गावातील १० वी १२वी चे गुणवंत विद्यार्थी तरुण मंडळ माता भगिनी ग्रामस्थ तसेच बाहेर गावारुन आलेले पर्यटक सुध्दा उपस्थित होते.तसेच डॉ ॠत्विक कोंडार,पुष्पा घोडे मॅडम,भरत वाजे,बुधा वळे,कुंडलीक पिचड,शाळेतील शिक्षक मुठे,चौधरी,गांगुर्डे यांचे विशेष सहकार्य लाभले.धनंजय वळे यांनी माईक साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली.भगवंता घोडे यांनी आभार मानले.विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button