जुन्नर (सचिन थोरवे)
बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन या वेळात प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुद्रुक या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी कॅम्प घेण्यात आला या कॅम्पमध्ये तालुक्यातील सावरगाव वारूळवाडी येणेरे आपटाळे इंगळून आणि पिंपळवंडी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील 75महिला लाभार्थी यांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ यांनी दिली
प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुद्रुक या ठिकाणी पहिल्यांदाच या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मान्यवर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले शस्त्रक्रियेसाठी आलेल्या प्रत्येक महिलेला त्या विभागातल्या आरोग्य केंद्रात अगोदरच्या दिवशी संध्याकाळी बोलावून दुसऱ्या दिवशी त्यांना सरकारी ॲम्बुलन्स मधून शिबिराच्या ठिकाणी आणण्यात आल्याचे डॉक्टर गवारी यांनी सांगितले शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंट शुद्धीवर येईपर्यंत त्या ठिकाणी गाद्यांवरती आराम करण्यासाठी सुसज्ज अशी व्यवस्था आरोग्य केंद्रात प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती सर्व सोयीने सुसज्ज आणि प्रशस्त जागेमुळे या ठिकाणी विना विलंब 75 शस्त्रक्रिया सर्जन अशोक मुंडे सर यांनी यशस्वीरित्या कर्मचाऱ्यांच्या साह्याने पूर्ण केल्या. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुन्नर तालुका युवा आघाडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी डॉक्टर अशोक मुंडे सर यांचे आभार मानले काही मिनिट वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ऑपरेशन रूम मध्ये एसी बंद झाला होता परंतु लगेच लाईट आल्यामुळे शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या यावेळी सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अक्षय जाधवर शिरोली बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर वाघिरे आणि त्यांच्या सर्व स्टाफने अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले होते या सर्व शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ या त्या ठिकाणी थांबून होत्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेशंटला परत सरकारी ॲम्बुलन्स मधून त्यांना त्यांच्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे आरोग्य विस्तार अधिकारी राजेश शेरकर यांनी सांगितले.