जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे,अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर,ता.जुन्नर, जि.पुणे येथे मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक मराठी भाषा गौरव दिन” मोठ्या आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे हे आपल्या मनोगतात म्हणाले “नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. मातृभाषेतून दिले गेलेले शिक्षण हे अतिशय प्रभावी असते.विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता त्याचा मर्यादित वापर करून ग्रंथरूपी ज्ञानदानाचा ठेवा आत्मसात करावा.” मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे म्हणाले ,”मराठीला वैभवाच्या शिखरावर घेऊन जाण्याचे काम आजच्या युवा पिढीने करावे.मराठी भाषेतला जो साहित्यरुपी अमूल्य ठेवा आहे.त्याचे वाचन, जतन व संवर्धन करणे हे
महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचे काम आहे” यानिमित्त महाविद्यालयात भव्य “मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम” राबविण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.सदर कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ.अमृत बनसोडे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ सुनील लंगडे, डॉ. रमेश काशिदे, डॉ.विनायक कुंडलिक, डॉ. किशोर काळदंते,प्रा. स्मिता सहाणे- पोखरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक चौधरी व सुप्रिया वरे यांनी केले.सदर प्रसंगी शितल कुमकर,तनुजा घोलप,चंद्रकांत लांडे,सृष्टी महाकाळ, या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गुणगौरव करणारी भाषणे केली. आभार अपर्णा घुले हिने मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ.छाया तांबे व डॉ. रोहिणी मदने यांनी केले.