प्रतिनिधी : सचिन थोरवे
डॉ सी व्ही रमण व डॉ ए पी जे अब्दुल कलाम या शास्त्रज्ञाच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून विज्ञानरूपी दिव्याने अज्ञानरूपी अंधार दूर करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यालयाच्या पॅसेजमध्ये विद्यार्थीनींनी आकर्षक विज्ञान प्रयोगाची रांगोळी काढली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे विज्ञान जेष्ठ अध्यापक श्री देवकुळे एस व्ही यांनी केले
तर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रसाद हांडे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या .इयत्ता ५ वी ते ८ वी तील ४० विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये कु .समुद्धी थोरवे, समिक्षा शिंदे, स्वराली जाधव, धुव शेलार, आराध्या पठारे ,नंदिनी ढमढेरे, शिंपलकर सानवी , मोरे कावेरी , पठारे आराध्या जानवी बटवाल ,भावना सोनवणे ,निष्मा नायकोडी , साक्षी चितळकर , तनिष्का नायकोडी ,जुई कोळी ,आर्या ढोमसे , धनश्री बोराडे ,जिया मोरे ,आर्या ढोमसे ,साक्षी सानप ,जोया मोमीन ,स्वरा राऊत , समृद्धी मोरे ,कल्याणी पाबळे ,विवेक तळेकर श्रवण थोरवे ,मनोज सिंगन , सायली घुमटकर ,आराध्या थोरवे ,सोहम वाघ , आराधना ढमढेरे ,कैलास काकडे ,श्रद्धा कांबळे ,पूजा फुलमाळी , रेश्मा फुलमाळी या विद्यार्थानी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष अनघा घोडके यांनी विद्यार्थ्यांना प्राचीन काळापासून ते आजपर्यंन्त स्वयंपाक घरामध्ये वापरामध्ये असणारे विज्ञान. धातूशास्त्र त्यांचा वापर.
नोबेल पुरस्काराची सुरुवात व त्याचे प्रणेते भारतीय नोबेल विजेते शास्त्रज्ञांची माहिती देवून बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. विद्यालयाच्या सर्व विज्ञान अध्यापकांकडून सर्व मनोगत व्यक्त करणाऱ्या बाल शास्त्रज्ञांना पेन भेट म्हणून देण्यात आले. तर विद्यालयाचे सांस्कृतीक विभाग प्रमुख श्री अय्यर सर यांनी स्वरचित विज्ञान शास्त्रज्ञांची नावे व त्यांचे शोध यांवर कविता सादर करून आभार प्रदर्शन केले .