जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
कुमशेत ता:-जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या सहकार्याने बुधवार दि:-२८फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व शास्त्रीय पद्धतीने साजरा करण्यात आला.अशी माहिती या शाळेचे गुणवंत शिक्षक व निसर्ग कवी यशवंत घोडे यांनी दिली. या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून बाल सभा घेण्यात आली.विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले.विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग बनवले काही विद्यार्थ्यांनी चंद्रयान अग्निबाण तीनच्या चित्रांचे रंगभरण केले.काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग केले सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
चित्रे काढली,निबंध माहिती लिहीली, घोषवाक्ये लिहिली.१)जय अंकुश डोके इ३री याने इलेक्ट्रॉनिक डिजे २) साई किशोर डोके ४थी याने इलेक्ट्रॉनिक कटर मशिन,३)रुद्र गणेश डोके व आरुष डोके इ १ली अग्निबाण प्रतिकृती, ४)सानवी धनंजय डोके इ ३री पाण्यावर तरंगत सरकणारे पान५)स्वरा व साई डोके यांनी रगांची किमया,६) पुर्वा डोके पाण्यात विरघळणाऱ्या वस्तू, ७)अग्निबाण प्रतिकृती,होड्या, विमान,घर प्रतिकृती बनवल्या होत्या.
यावेळी शिक्षक श्याम लोलापोड यांनी भारतीय शास्त्रज्ञांविषयी माहिती सांगितली तर शिक्षक यशवंत घोडे यांनी काही प्रात्यक्षिकांव्दारे विज्ञानाचे फायदे सांगितले.जग बदलले शोधांनी हि स्वरचित कविता सादर केली.विज्ञान दिनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला.विज्ञानाची महती किमया विद्यार्थ्यांना समजली.भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान,मेक इन, इंडिया,जय विज्ञान जय तंत्रज्ञान, विज्ञान शाखा उघडल्या अंधश्रद्धा गाडल्या,अशा घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले.प्रेरणा मिळाली.अंधश्रध्दा गैरसमज दूर झाले.या कार्यक्रमात पालक शिवाजी हरिभाऊ डोके, धनंजय डोके हे उपस्थित होते.अध्यक्ष स्थानी आर्या डोके इ ४थी होती सुत्रसंचलन प्रज्वल नाईकवाडी ३ररी याने केले.तर शेवटी श्रुती डोके इ २री हिने आभार मानले.