जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नरयेथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात विविध उपक्रमांद्वारे विज्ञान दिन साजरा झाल्याची माहिती मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.
२८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात.आपल्या देशाचे थोर भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर सी .व्ही. रामन यांच्या “रामन इफेक्ट”या संशोधनाला नोबेल पारितोषिक मिळाले.त्यांच्या या संशोधनाचा गौरव म्हणून २८ फेब्रु हा दिवस संपूर्ण देशात युवकांना विज्ञान क्षेत्रातील करिअर साठी प्रेरित करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने विद्यालयातील पलक डोंगरे, वरद डोंगरे,प्राणवी डुंबरे,ईश्वरी रोकडे,मनस्वी शिंगोटे या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनावर आधारित भाषणे केली.
तसेच विद्यालयातील विज्ञान शिक्षक मिलिंद खेत्री यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान निर्माण करण्याचे आव्हान केले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका राजश्री भालेकर,पर्यवेक्षक संजय हिरे,ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब खाडे,भगवंत घोडे, विजया गडगे,शरद माळवे,राजाराम शिंदे,कांचन इसकांडे,बाळासाहेब साबळे,लक्ष्मण दुडे,अनिल जवरे, दिनेश ताठे,आसावरी गायकर,वनिता भोर,सोनाली माळवे,सोनाली कांबळे,अपेक्षा गोरे,सुजाता राऊत, अश्विनी नलावडे,आशा डुंबरे,अनुराधा इसकांडे,आदी उपस्थित होते.
विशाल चौधरी यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले.विजय खरात यांनी आभार मानले.