( पेढे वाटून केला आनंद व्यक्त)1
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर आंबेगाव तालुक्यात जून २०२० मध्ये झालेल्या निसर्गचक्री वादळात हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या नुकसानी पोटी महाराष्ट्र सरकारने पंधरा कोटी रुपये देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आदिवासी लोकांचे हिरडा हे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत असून दरवर्षी यातून चांगले उत्पन्न मिळते.
३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्गचक्रीवादळात या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.हिरडा हे पीक म्हणून वनउपजत मध्ये येत असल्याने याचे पंचनामे करण्यात अडचणी येत होत्या.राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन याचे पंचनामे करायला लावले.तेव्हापासून ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. कोरोना काळामध्ये हा विषय मागे पडला. अखिल भारतीय किसान सभेने यासाठी सतत पाठपुरावा केला.मुंबई येथे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे या नुकसान भरपाईचा विषय मांडण्यात आला.यावेळी मंत्रिमंडळाने या नुकसान भरपाईपोटी पंधरा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला.हिरडा नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंचर येथे प्रांत कार्यालयात पुढे अखिल भारतीय किसान सभेचे धरणे आंदोलन मागील दहा दिवसांपासून गावच्य सुरू होते. या निर्णयानंतर किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला व आपले धरणे आंदोलन मागे घेतले,यावेळी समाज कल्याणचे युवक माजी सभापती सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप,नंदकुमार सोनावले,प्रदीप आमोडकर,संजय गवारी तर किसान सभेचे अमोल वाघमारे,राजू घोडे,अशोक पेकारी यांनी पेढे वाटत या निर्णयाचे स्वागत केले.
दरम्यान,आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील ६५ गावातील पाच हजार शेतकऱ्यांना पंधरा कोटी रुपये मिळणार आहेत. यामुळे हिरडा – उत्पादक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न सुटला असल्याचे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.