जुन्नर तालुका प्रतिनिधी :-रविंद्र भोर
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने महाराष्ट्र नाभिक महामंडळ जुन्नर तालुकाध्यक्षपदी निवृत्त नायब तहसिलदार,ह.भ.प.अरुण क्षिरसागर तर सचिवपदी फॅशन डिझायनर,फेटामेकर्स नित्यानंद नेवकर आणि पुणे जिल्हा नाभिक महामंडळाच्या संघटक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार रविंद्र भोर व सामाजिक कार्यकर्ते सुनिल खंडागळे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा नाभिक महामंडळ अध्यक्ष अशोक मगर यांनी दिली. सोमवार दि:-१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती चे औचित्य साधून नारायणगाव येथील संतसेना महाराज मंदिरात जुन्नर तालुक्यातील सर्व नाभिक बंधू- भगिनीच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महारांजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले त्यानंतर संतश्रेष्ठ सेना महाराज यांचे विधिवत पूजन करण्यात आले.यावेळी जय भवानी,जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज की जय,संत सेना महाराज की जय इत्यादी घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.त्यानंतर जुन्नर तालुका महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून अरुण क्षिरसागर, सचिव म्हणून नित्यानंद नेवकर, पुणे जिल्हा संघटक म्हणून रविंद्र भोर व सुनिल खंडागळे यांच्या नावांची घोषणा पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक मगर यांनी केली.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ अध्यक्ष अशोक मगर,उपाध्यक्ष:-अंकूश जाधव, युवक अध्यक्ष सुनिल वाळुंज, महिला अध्यक्ष:-अर्चनाताई नेवकर,सचिव:- नितीन कुटे,रविंद्र भोर,दशरथ मंडलिक सुनिल खंडागळे,अरुण क्षीरसागरनित्यानंद नेवकर,नाना कदम, तेजपाल रायकर,रविंद्र रायकर, संतोष रायकर,निलेश नेवकर,चंद्रशेखर कदम,माऊली नेवकर,आंबेगाव तालुक्यातील मंचर गावचे माजी उपसरपंच गणपत क्षिरसागर, रत्नाकर कोऱ्हाळे यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.