प्रतिनिधी : जिजाबाई थिटे

शिवगर्जना प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी आलेगाव पागा येथे शिव जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावरून ज्योत येत असते याही वर्षी या ज्योतीचे ग्रामस्थांकडून ढोल ताशाच्या गजरात व फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. शिवगर्जना प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती उत्साहाच्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते रक्तदान शिबिर, व्याख्याने ,विद्यार्थ्यांचे मर्दानी खेळ, आशा कार्यक्रमाचे नियोजन करून मिरवणुकीने सांगता होत असते.गावातील बहुसंख्य तरुण वर्ग शिवनेरी किल्ल्यावर जाऊन ज्योत घेऊन आले त्यानंतर गावामध्ये शिवस्तंबाजवळ आरती घेण्यात आली.त्यानंतर श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहारार अर्पण करून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बेनके,मच्छिंद्र बेनके, शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल दादा वाघचौरे शिवसेनेचे नेते लालासाहेब वाघचौरे ,बाळकृष्ण वाघचौरे,राजेंद्र गुळवे, रामदास वाघचौरे,संदीप भोसले,जयदीप वाघचौरे,सुभाष दिवटे, सोमेश्वर वाघचौरे, विजय बेनके,गणेश वाघचौरे,सोमेश्वर धावडे,दत्तात्रय वाघचौरे,गोरक्ष भोसले,बाळासाहेब वाघचौरे, समीर शेख, विष्णू भोसले ,मुरली वाघचौरे, हेमंत दरडा,लक्ष्मण हरीहर संतोष शेलार,सुभाष वाघचौरे इ.ग्रामस्थांच्या उपस्थित आरती घेण्यात आली.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button