शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण भारत देशात उत्साहात साजरी होत असताना स्वाभिमानी मराठा महासंघ शिरूर तालुक्यातील महिला आणि पुरुष पदाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पुणे जिल्हा, आणि महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी यांच्या सहकार्याने तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ.कृषिराज टकले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्रापूर कासारी फाटा येथील गुरुकुल संस्थेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना भोजन आणि किराणा भेट देऊन शिवजयंती साजरी करण्यात आली.
महिला पदाधिकारी यांची उपस्थिती उल्लेखणीय होती अमृत पठारे,अलका सोनवणे, वंदना घोलप, शिवशंभूप्रिया जांभळे,मीरा शिंदे, जयश्री बांगर, अश्विनी सावंत, चैत्राली जगताप, वैशाली बहिरट,सुरेखा निघोट, सावित्रीबाई शिंदे,शिवाजीराव शिंदे,लहुजी सातपुते, श्रीकांत हारदे,अनिल हरगुडे,उज्वल ईरोळे, ज्ञानदेव आमते, प्रविण पर्हाड,भाऊसाहेब गावडे, सुनील मांजरे, राजेंद्र क्षिरसागर,सोनाजी सोळंके,इ.उपस्थित होते शिवजयंती ही नाचुन साजरी करण्यापेक्षा वाचुन साजरी झाली पाहिजे तसेच उद्याच्या येणाऱ्या काळातही नाविन्यपूर्ण उपक्रम स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करणार असल्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील यांनी सांगितले, पुणे जिल्हाअध्यक्षा महिला आघाडी अलकाताई सोनवणे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला, सर्व पदाधिकारी यांनी शिवरायांच्या विचारांची मनोगते व्यक्त केली,सुत्रसंचलन ज्योती सातव यांनी केले आभार शिवशंभूप्रिया जांभळे यांनी मानले .