.(महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४ जुन्नर तहसीलदार कार्यालय समोर निदर्शने व निवेदना व्दारे केली मागणी)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
महाराष्ट्र सरकारने वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांची पगारवाढ व अन्य महत्वपूर्ण प्रलंबित प्रश्न लवकर सोडवावेत भरती मध्ये या कामगारांना प्राधान्य द्यावे,वयात सवलत व विशेष आरक्षण द्यावे या बाबतीत ऊर्जामंत्री व प्रशासनाने त्वरीत चर्चा करून कामगारांना न्याय द्यावा. अन्यथा दि.२८ व २९ फेब्रु २०२४ रोजी लाक्षणिक काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४ ने आज दि:-१४ फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालय जुन्नर जि :-पुणे येथे लाक्षणिक निदर्शने करून देण्यात आला आहे.
-:प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे:-
१ ) सर्व कंत्राटी कामगारांना ३० % वेतन वाढ देण्यात यावी.
२) रानडे समिती च्या शिफारशी त्वरित लागु करून कामगारांना एन एम आर माध्यमातून कायम नोकरीत समाविष्ट करावेत.
३) कायम करित नाही तोपर्यंत भ्रष्टाचार टाळण्यासाठी कंत्राटदार मुक्त रोजगार देण्यात यावा.
जुन्नर तहसीलदार कार्यालय येथे झालेल्या द्वारसभेच्या वेळी कृती समिती सदस्य व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ राहूल हांडे ,विजय शिंदे राहूल बरबडे ,जितेंद्र शिंदे , नवनाथ केंगले सुभाष टाकळकर तसेच ( वि. कं. का.संघ मंचर विभाग संघटनमंत्री , भारतीय मजदूर संघ जुन्नर तालुका अध्यक्ष दिपक शिंदे यांनी मा तहसीलदार मॅडम सारीका रासकर यांनी निवेदन स्विकारून वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल असे आस्वासन दिले आहे. तालुक्यातील वीजउद्योगातील कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.