जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते, जुन्नर विधानसभेचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे,शरद पवार यांचे विश्वासू सहकारी माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे रविवारी दि:-११ रात्री १०.३० वा.दीर्घआजाराने निधन झाले ते ७४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री बेनके,प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अमोल बेनके,जुन्नरचे आमदार अतुल बेनके, युवा नेते अमित बेनके,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

वल्लभ बेनके यांचा जन्म २३ जून१९५० ला जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक या गावात झाला.जुन्नर विधानसभा मतदारसंघातून १९८५ मध्ये भारतीय इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथम ते निवडून आले होते.त्यानंतर १९९० पुन्हा निवडून आले.सन २००४ आणि २००९ मध्ये पराभूत होऊनही जुन्नर मतदार संघात आपला दरारा ठेवून सर्व सामन्याचे प्रश्न सोडविणारे बेनके यांना राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. उत्तर पुणे जिल्ह्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात दरारा असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे सन २००९ आणि २०१४ मध्ये ते पुन्हा निवडून आले होते.सर्व पक्षांमध्ये त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते.कुकडीच्या पाण्यासाठी नेहमीच त्यांनी संघर्ष केला होता.त्यांच्याच काळात जुन्नर तालुकाकृषीप्रधान तालुका म्हणून उदयास आला.:-शेतकरी,कष्टकऱ्यांसाठी लढणारा संवेदनशील नेता हरपला-:अजित पवार

माजी आमदार वल्लभशेत बेनके यांच्या निधनामुळे शेतकरी, कष्ट- कन्यांसाठी लढणारे, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक,सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके हे १९८५ साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते,त्यानंतर १९९० मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले.वर्ष २००४ व २००९ मध्ये पुन्हा त्यांनी जुन्नर मतदारसंघाचे विधान- सभेत प्रतिनिधित्व केले.परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात दरारा होता.

:–आज होणार अंत्यसंस्कार–:माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे.आज सोमवारी दुपारी १२ पर्यंत नारायणगाव येथील निवासस्थान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे मूळ गाव असलेल्या हिवरे बुद्रुक येथे सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button