निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार

मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.अब्दुल सत्तार इनामदार साहेब यांच्या नेतुत्वाखाली तसेच मुस्लिम विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.शेरखान अकबरखान यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिरूर शहर या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांची महत्वपुर्ण बैठक पार पडली.या बैठकीमध्ये पुणे जिल्हा कार्यकारणी संदर्भात तसेच मुस्लिम समाजाच्या समस्या व अडिअडचणी आदि.विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीमध्ये मुस्लिम विकास परिषदेच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी धडाडीचे युवा कार्यकर्ते रिजवान बागवान यांची निवड सर्वांनुमते जाहिर करण्यात आली.

सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेरखान अकबरखान यांच्या शुभहस्ते रिजवान बागवान यांना निवडीचे पञ देऊन गौरविण्यात आले.तसेच पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

आपण मुस्लिम समाज बांधवांच्या विविध प्रश्न, समस्या,अडिअडचणी आदि. विषयांवरती मुस्लिम विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन सोडविणार असल्याचे रिजवान बागवान यांनी सांगितले आहे.

या निवडीबद्दल रिजवान बागवान यांचे सर्वञ कौतुक व अभिनंदन होत आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button