(मदतीचा ओघ सुरूच : कोल्हापूर,पुण्यातील दानशूर भेटीला)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
कौठेवाडी ता:-अकोले येथील वनिता भांगरे हिच्या जीवनाचा संघर्ष “” शिरूर महाराष्ट्र न्यूज’ने मांडला.त्यानंतर अनेक मदतीचे हात पुढे आले. बहुतेकांनी शेळ्या घेण्यासाठी रक्कम दिली,तर काहींनी आर्थिक मदत करून कुटुंबाला सावरले. कोल्हापूर येथील अरुण केसरकर,पिंपरी-चिंचवड येथील माधुरी चव्हाण,राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिच्या कुटुंबाला भेट देऊन मोठ्या मदतीची हमी दिली,कोल्हापूरयेथील अरुण केसरकर व त्यांच्या मित्र परिवाराने व्हिडीओ कॉलिंगद्वारे वनिता हिच्याशी संपर्क साधला.तिच्या अडचणी समजावून घेतल्या.पिंपरी-चिंचवड येथील माधुरी चव्हाण व त्यांच्या ग्रुपने तिच्या भावाच्याशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली,
राजूर येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्या मंजूषा काळे,शिक्षक किरण भागवत,सतीश काळे,सुनीता पापळ,अनिल नाईकवाडी,तसेच विद्यार्थ्यांनी भेट देऊन मदत केली.दोन्ही मुलांचे शिक्षण करण्याची हमी घेतली.यावेळी माजी उपसरपंच सुरेश भांगरे उपस्थित होते.विमल हांडे, विलास पानसरे,सविता भोर,नयना राक्षे,राजेंद्र आरोटे, विलास माळी,रवींद्र लोहोटे,शांताराम अहिनवे,संतोष गायकर,संतोष ढमाले,जयश्री नलावडे,कैलास वारुळे, राजू अम्प,संदीप नेहरकर,विजया दांगट,राणी तांबे आदींनी २३ हजार ५०० रुपयांची मदत दिल्याने शेळ्या घेता आल्या, स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या आवाहनाला साद देत ५१ हजार रुपयांची मदत दिली. पुण्यातील सत्येंद्र राठों, कीर्ती कासट, स्वाती लड्डा यांनी प्रत्येकी १२ हजारांची मदत दिली. त्यामुळे नऊ शेळ्या घेतल्या.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.यापत्रकाराचा लेखणीचा एखाद्या कुटुंबाचा कल्याणास आणि समाजाला कसा उपयोग होतो, हे या बातमीदाराने आपल्या लेखणीतून करून दाखवले, एका बातमीमुळे रेशनकार्ड मिळाले,घरात वीज,अपंग प्रमाणपत्र मिळाले.आम्ही अण्णासाहेब वाघिरे कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने (बॅच १९९४-९७) ने कुटुंबाला २३ हजार ५०० रुपयांची मदत दिली. अशी माहिती बोर्डरलेस पँथरचे कृतिशील सदस्य पोपट नलावडे, ओतूर यांनी दिली.