( केबल चोरांच्या मुसक्या आवळून दिले पोलिसांच्या ताब्यात)
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
फिर्यादी भूषण कुलवडे शनिवारी रात्री उदापूर गावच्या हद्दीतील पुष्पावती नदी किनारी ८.३० वाजे दरम्यान विहिरीच्या मोटरला स्टार्टर बसवण्यासाठी गेले असता,त्यांना त्यांच्या मोटारीस जोडलेली वीज प्रवाहाची वायर दिसली नाही म्हणून त्यांनी चोरीला गेलेल्या वायरचा शोध आजूबाजूच्या परिसरात घेतला. यावेळी त्यांना पुष्पावती नदीच्या तीरावर दोन जण त्यांची चोरीला गेलेली वायर जाळतांना दिसले. त्यानंतर कुलवडे यांनी मित्रांच्या मदतीने या इसमांना पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले व त्यांच्या विरोधात पोलिसात चोरीची फिर्याद दिली.
ओतूरमधील पोलिसांनी दोन केबल चोरांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.कृष्णा सकरू शिंगवे (वय ३५ रा.बदलपाडा ता.कुडाळ,जि. पालघर) व कैलास जगन वागे (वय ३०, रा. काकडपाडा, ता. कल्याण, जि.ठाणे) अशी अटक केलेल्या केबल चोरांची नावे आहेत.त्यांच्याकडून ६५०० रूपये किमतीची काळ्या रंगाची ६५ फूट लांबीची मोटारची वायर,६५०० रूपये किमतीची ६५ फूट पाण्यातील मोटारीची सिल्व्हर रंगाची जळालेली वायर, ९५०० रूपये किमतीची पाण्यातील मोटारीची सिल्व्हर व तांबट रंगाची ६५ फूट लांबीची वायर असे एकूण अंदाजे २२,५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत उदापूरच्या भूषण कुलवडे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नदिम तडवी व संदिप लांडे करीत आहेत.