प्रतिनिधी : सचिन थोरवे

नारायणगाव कोल्हेमळा येथील सुविधा सोसायटी मध्ये चोरी करून दागीने लंपास करणाऱ्या उसतोडी करणाऱ्या महिलेस नारायणगाव पोलीसांनी 24 तासाचे आत ठोकल्या बेड्या.

एकुण 4,30,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने जप्त करत केली 100 टक्के मुद्देमालाची रिकव्हरी* दिनांक 28/01/2024 रोजी दुपारी 01/15 वा.चे दरम्यान श्री. बाबाजी लक्ष्मण दिघे रा. सुविधा रेसिडेन्सी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून घरामध्ये प्रवेश करून घरामधील कपाटातील एकुण 4,30,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरी करून नेल्याबद्दल नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे,पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे,पोलीस कॉन्स्टेबल संतोष, पोलीस कॉन्स्टेबल सत्यम केळकर साळुंके यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन कोल्हेमळा नारायणगाव व आसपासच्या परिसरातील 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेज चेक करून सदर गुन्ह्यातील संशयित ऊसतोड करणारी महिला नामे कविता नवनाथ बर्डे वय-23 वर्ष रा.निवृत्तीनगर विघ्नहर साखर कारखाना जुन्नर जि.पुणे हिस ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर महिला आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून एकुण 4,30,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने सदर महिला आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे हे करत असून ग्रामस्थांकडून नारायणगाव पोलीसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

सदरची कामगीरी ही मा.अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. मितेश घट्टे सो अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.रविंद्र चौधर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग व मा.अविनाश शिळीमकर सो स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे,पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे,पोलीस कॉन्स्टेबल संतोष साळुंके,पोलीस कॉन्स्टेबल सत्यम केळकर,पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष हासे,पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर कोतकर,पोलीस कॉन्स्टेबल गोरख केंद्रे, पोलीस महिला पोलीस हवालदार प्रियंका लोंढे, मपोकॉ शुभांगी दरवडे, मपोकॉ सोनाली रघतवान यांनी केली आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button