शिरूर प्रतिनिधी - शुभम वाकचौरे
पञकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी व अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा उभारून पञकारांना न्याय देणारी संघटना म्हणजे द युवा ग्रामीण पञकार संघ,या संघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी निर्वी येथील शकील मनियार यांची तर शिरूर तालुका उपाध्यक्षपदी रांजणगाव गणपती येथील विवेकानंद फंड व सणसवाडी येथील विश्वनाथ घोडके यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.
शिरूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय येथे पार पडलेल्या द युवा ग्रामीण पञकार संघ आयोजित मराठी दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन सोहळ्यात तालुका अध्यक्ष शकील मनियार तालुका उपाध्यक्ष विवेकानंद फंड व विश्वनाथ घोडके यांना संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख,राज्य कार्याध्यक्ष शामभाऊ कांबळे,इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रमुख रोहित वाळके,पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान आदि.यांच्या शुभहस्ते गौरव करून नियुक्तीपञ देण्यात आले.
तालुकाअध्यक्षपदी शकील मनियार तालुका उपाध्यक्षपदी विवेकानंद फंड व विश्वनाथ घोडके यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.तात्यासाहेब सोनवणे,द युवा ग्रामीण पञकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष मा.शामभाऊ कांबळे,निमोणे गावचे सरपंच मा.संजय (आबा) काळे,मा.आदर्श सरपंच जिजाताई दुर्गे,देवदैठण गावचे मा.सरपंच मंगलताई कौठाळे,सामाजिक कार्यकर्ते हाजी सादिकभाई बागवान,शालेय व्यवस्थापन समितीचे निर्वी अध्यक्ष मा.प्रदिपभाऊ साळुंकेशरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष मा.नवनाथ गव्हाणे,श्रीपाद उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.कमलेश बुराडे,द युवा ग्रामीण पञकार संघाचे नगर तालुकाध्यक्ष मा.हेमंत साठे,सदस्य बिभिषण झेंडे आदिंनी कौतुक करून अभिनंदन केले आहे आहे. द युवा ग्रामीण पञकार संघाची कार्यकारणी पुढीलप्रमाणे- तालुकाध्यक्ष शकील मनियार,तालुका उपाध्यक्ष विवेकानंद फंड,विश्वनाथ घोडके,तालुका सचिव अक्षय वेताळ,तालुका कार्याध्यक्ष सुजित मैड,तालुका संपर्कप्रमुख विजय कांबळे,तालुका सल्लागार संतोष काळे,तालुका कोषाध्यक्ष मच्छिंद्र काळे,तालुका खजिनदार संजय मोरे,तालुका संघटक सुदर्शन दरेकर,तालुका सरचिटणीस सुनिल काटे,कायदेविषयी सल्लागार एडवोकेट इन्नुस मणियार आदि.