निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
ग्रामपंचायत वारुळवाडी व राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती 103 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी पिंपरी चिंचवडचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक दादाभाऊ आल्हाट प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले, “अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट अतिशय संघर्ष आहे ‘.ग,म,भ,ण,अक्षर शिकणारा माणूस विश्व साहित्यिक होतो .रशियाचा प्रवास करतो. आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान कार्याचा पोवाडा रशियामध्ये सादर करतो” ‘”अण्णाभाऊ साठे म्हणजे महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीतील एक अग्रगण्य नाव होते'” या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर सदानंद राऊत ,बाजीराव गायकवाड, अमोल आल्हाट, किसन शेळके, सचिन उंडे ,विनोद साबळे, राजेंद्र पानसरे ,संदीप पंचरास ,विद्याधर खुडे, अभिजीत माने ,आदेश शिंदे ,गजानन आल्हाट आदी मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . व परिसरातील गोरगरीब महिलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले
या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे , क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे महाराष्ट्र शासन समिती अध्यक्ष अशोक लोखंडे, उपाध्यक्ष शिवाजी राजे राजगुरू, सेवानिवृत्त वनअधिकारी वसंतराव लोंढे,धर्मवीर नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष मेहबूब काझी, शिवसेनेचे समन्वयक रवींद्र करंजखेले, शिवसेना नेते सुनील बाणखेले, शिवसेनेचे सल्लागार शशी बाणखेले , क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे महाराष्ट्र शासन समिती सदस्य रामदास साळवे ,माजी मुख्याध्यापक एच .पी नरसुडे, वगसम्राट किरण ढवळपुरीकर, संगीतरत्न संजय महाडिक, तमाशा फड मालक सौ नंदा भोकटे, तमाशा फड मालक मुसा भाई इनामदार, व्यवस्थापक काशिनाथ फुलसुंदर ,युवा नेते सुरज वाजगे, राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सल्लागार अनिल शिंदे ,संचालक अनिल खुडे, सचिव अमित आल्हाट,सुभाष दुबळे, सचिन लोखंडे ,किरण आल्हाट, अनिल आल्हाट, निलेश आल्हाट, श्रीकांत आल्हाट, पवन लोखंडे, दीपक साळवे ,काळूराम लोंढे, राहूल आल्हाट, अमोल गावडे,बाळू महाडिक आदींनी भरपूर कष्ट घेतले.
यावेळी प्रसिद्ध गायिका शारदा गावडे, नंदा भोकटे , सीमा महाडिक, अनुराधा खंडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर गीते सादर केली. तर पमाजी पंचरास , नरेश पंचरास, संदीप पंचरस नामदेव जगताप, नितीन पंचरास दादाभाऊ पंचरास, गणेश पंचरास ,दादाभाऊ आल्हाट, भगवान गायकवाड ,बबन राजगुरू आदींनी आपली पारंपरिक कला सादर केली.