जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर

पुणे जिल्ह्यातील जीओ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देशाच्या अमृत महोत्सव निमित्ताने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अत्यंत दुर्गम आदिवासी भागात जिओ टॉवर उभारून सर्व आदिवासी जनतेला नेटवर्क उपलब्ध करून दिले त्या जांभुळशी येथील जिओ टॉवर जवळ भारतीय तिरंगा ध्वज मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात फडकावला.यावेळी जिओ कंपनी एचआर श्री अमित गिरधर,श्री.शशीभूषण इंगळे,श्री. प्रवीण,श्री.पवन जोशी,श्री.संदेश शिंदे, श्री.कमलेश गायकर, मकसूद शेख,आकाश भद्रीके, कोपरे गावचे माजी सरपंच ठमा कवटे,मांडवे गावचे उपसरपंच मच्छिंद्र तळपे,ग्रामपंचायत सदस्य अरुण सोनवणे, हरिबा माळी,निकेश राऊत,दीपक चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जांभुळशी येथील टॉवरवर ध्वजारोहण प्रसंगी या आदिवासी भागातील अनेक समस्या सोडवण्यासाठी ज्यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडणारे व या आदिवासी भागातील लोकांना नेटवर्क उपलब्ध करून देण्यात या जिओ टॉवर उभारण्यात ज्यांनी सिंहाचा वाटा उचलणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर यांचा सत्कार जिओ नेटवर्क कंपनीचे एचआर अमित गिरीधर व उपस्थित आधिकारी यांचे करण्यात आला.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button