गुरूकुल वस्तीगृहातील वंचित मुलांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप..
निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
१५ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय स्वातंञ्य दिनानिमित्त शिक्रापुर (जि-पुणे) परिसरातील कासारी फाटा येथील आर्शिवाद ट्रष्ट संचलित गुरूकूल वस्तीगृह या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा कार्यक्रम शिक्रापुर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक प्रमोद क्षीरसागर साहेब व ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.डॉ.अरूण (आबा) जाधव साहेब यांच्या मार्दगर्शनाखाली तसेच भारतीय सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन परशुराम शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न करण्यात आला.यावेळी वस्तीगृहातील गोरगरिब,वंचित मुलांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.यावेळी महंत,मौलाना व बौध्दाचार्य एकाच मंचावर उपस्थित होते.त्यातुन राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन परशुराम शिंदे साहेब,श्रीकृष्ण मंदिर (कासारी फाटा) महंत रविंद्रजी बाबा पंजाबी महाराज,जामा मस्जिद शिक्रापुरचे मौलाना इकबालभाई खान,भारतीय बौध्द महासभेचे शिरूर तालुका कोषाध्यक्ष बौध्दाचार्य मुकेशजी गायकवाड आदिंनी सखोल मार्गदर्शन करून सर्व धर्म समभाव,हम सब एक है,भाईचारा व सामाजिक एकतेचा संदेश देऊन स्वातंञ्य दिनाच्या सर्व भारत वासियांना शुभेच्छा दिल्या.
आयोजित व संपन्न झालेल्या राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा कार्यक्रमाला भारतीय सैन्य दलातील निवृत्त माजी सैनिक मेजर बबन फलके,मेजर पोपट महाजन,कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ समितीचे संस्थापक अध्यक्ष व मा.पंचायत समिती सदस्य सर्जेराव भाऊ वाघमारे,स्वाभिमानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील,सिमाई फाऊंडेशच्या संस्थापक अध्यक्षा सिमाताई पवार,केसुला बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव,पोलिस मिञ संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी शेलार,भुमाता बिग्रेड संघटनेच्या शिरूर तालुका अध्यक्षा डॉ.मंगलताई सासवडे,आँल इंडिया पँथर सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ गायकवाड,शिक्रापुर जामा मस्जिदचे सभासद सिराजभाई शेख,मौलाना अशरफ सहाब,मौलाना मुबसीर,बौध्दाचार्य पोपट सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते अनिल (आण्णा) पवार,युवासेनेचे शिरूर तालुका उपप्रमुख सोमनाथ (बंटी) नवले,केंद्रिय मानव अधिकार संघटनेेचे शिरूर तालुका अध्यक्ष तात्याराम मोरे,गुरूकूल वस्तीगृहाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंदे सर,मोतीराम निकुंभ,मालोजी भेदेकर,तुकाराम मोरे,दत्ता माने,सतिष कवडे,हरिष गुडदे,विनोद खंदारे,श्रीकांत हारदे,अजित वाघोले,विठ्ठल परदेशी,विपुल घोडके,आदि पदाधिकरी व कार्यकर्ते,सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन रिजवान बागवान,प्रास्ताविक विश्वनाथ घोडके केले होते तर आभार शकील मणियार यांनी मानले आहे.